Wednesday, November 5, 2025

आगामी जिल्हा परिषद महापालिका निवडणुकीसाठी कार्यकर्त्यांनी कामाला लागावे ;आमदार संग्राम जगताप

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वर्धापन दिनानिमित्त नियोजनाची बैठक संपन्न

आ. गोपीचंद पडळकर व लक्ष्मण हाके यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने निषेधाचा ठराव मंजूर

कार्यकर्त्यांनी जिल्ह्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा एक नंबरचा करण्यासाठी काम करावे – आ. संग्राम जगताप

अहिल्यानगर : जिल्ह्यामध्ये राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांची राजकीय ताकद मोठी आहे कार्यकर्त्यांनी जनतेचे प्रश्न हाती घेऊन ते सोडविण्याचे काम करावे त्या माध्यमातून नागरिकांचा विश्वास संपादन केला जातो पक्षाचे संघटन मजबूत असल्यावरती खऱ्या अर्थाने नागरिकांचे काम मार्गी लागत असतात कार्यकर्त्यांनी पक्षाच्या आदेशाची वाट न पाहता आपला विकासाचा अजेंडा तयार करून गाव पातळीवर, वार्डात काम करावे, आम्ही आमचा अजेंडा तयार करून काम करतो निवडणुकीमध्ये विजय मिळवण्यासाठी सातत्याने काम करत राहणे गरजेचे आहे, पुणे बालेवाडी येथे होणाऱ्या वर्धापन दिनानिमित्त कार्यक्रमाला नगर जिल्ह्यातून मोठ्या संख्येने कार्यकर्ते जाणार आहे, जिल्ह्यातील प्रत्येक मतदार संघातील राजकीय भौगोलिक परिस्थिती वेगळी आहे त्यानुसार आपण सर्वांनी काम करावे पक्षामधील मतभेद बाजूला ठेवून नवीन फळी तयार करा, मनपा, जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीचे काम देखील सुरू करा. जिल्ह्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा एक नंबरचा करण्यासाठी काम करावे असे प्रतिपादन आमदार संग्राम जगताप यांनी केले
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा वर्धापन दिन 10 जून रोजी पुणे बालेवाडी येथे होणार असून त्या कार्यक्रमाच्या नियोजनाच्या बैठकीत आमदार संग्राम जगताप बोलत होते यावेळी आमदार काशिनाथ दाते सर, जिल्हाध्यक्ष अशोक सावंत, शहर जिल्हाध्यक्ष संपत बारस्कर, राजेंद्र नागवडे, घनश्याम शेलार, प्रा. माणिकराव विधाते, प्रशांत गायकवाड, अभिजीत खोसे, संतोष धुमाळ, सुमित कुलकर्णी, अशोक चोभे, बाळासाहेब शिंदे, विजय देशपांडे, संजय कोळगे, सचिन डेरे, संध्या सोनवणे, महिला शहर जिल्हाध्यक्ष आशाताई निंबाळकर, सुषमा रावडे आदी उपस्थित होते.
आमदार काशिनाथ दाते सर म्हणाले की, पुणे येथे १० तारखेला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा वर्धापन दिन मोठ्या उत्साहात साजरा होणार आहे तरी नगर जिल्ह्यातून सर्वात जास्त कार्यकर्ते सभेला जाणार आहे, आपल्या जिल्ह्यामध्ये विधानसभेचे ४ आमदार असून एक विधान परिषदेचे आमदार आहे त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची ताकद मोठी आहे, येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीमध्ये आपल्या पक्षाची ताकद दाखवी लागेल, वेळ पडल्यास स्वतंत्रपणे निवडणुका लढण्याचा निर्णय झाल्यास आपली स्वतंत्र तयारी असणे गरजेचे आहे तरी कार्यकर्त्यांनी जनतेमध्ये राहून पक्षाचे काम करावे व शासनाच्या योजना त्यांच्यापर्यंत घेऊन जाव्यात असे ते म्हणाले
यावेळी जिल्हाध्यक्ष अशोक सावंत यांनी पुणे बालेवाडी येथे होणाऱ्या मेळाव्याच्या नियोजनाबाबत सविस्तर माहिती दिली

आमदार गोपीचंद पडळकर व लक्ष्मण हाके या दोन व्यक्ती राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर सातत्याने बिनबुडाचे आरोप करत टीका करत असतात आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने त्यांच्या निषेधाचा ठराव एकमताने मंजूर करण्यात आला आहे, वेळ पडल्यास नगर जिल्ह्यामध्ये या दोघांना त्यांची जागा दाखवली जाईल असा इशारा बाळासाहेब शिंदे यांनी दिला

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles