Wednesday, October 29, 2025

आमदार संग्राम जगताप यांची विधानसभेत मनपाच्या कारभाराविरोधात तक्रार, आयुक्त डांगे यांच्या कडून कर्मचाऱ्यांची कानउघडणी

नगररचना विभागातील अधिकारी, कर्मचाऱ्यांची आयुक्तांकडून कानउघडणी

छाननी झाल्यावरच ऑनलाईन फाईल दाखल करून घ्याव्यात, आयुक्त तथा प्रशासक यशवंत डांगे यांच्या सूचना

नगररचना विभागातील प्रलंबित प्रकरणांचा घेतला आढावा

अहिल्यानगर – बांधकाम परवानगीसह सर्व प्रकरणांची ऑनलाईन फाईल दाखल होण्यापूर्वी त्याची छाननी करून घ्यावी. ऑनलाईन फाईल दाखल होण्यापूर्वीच त्रुटी दूर करून घेतल्यास पोर्टलवर फाईल प्रलंबित राहणार नाही, अशा सक्त सूचना आयुक्त तथा प्रशासक यशवंत डांगे यांनी नगररचना विभागातील अधिकारी व कर्मचाऱ्यांना दिल्या आहेत. तसेच, प्रलंबित असलेल्या प्रकरणाबाबत जाब विचारून त्यांची कानउघडणीही त्यांनी केली. नागरिकांनीही ऑनलाईन फाईल दाखल करून घेण्यापूर्वी त्याची छाननी करून घ्यावी, जेणेकरून त्रुटी विरहीत फाईल दाखल होईल व ती प्रलंबित राहणार नाही, असेही आयुक्त तथा प्रशासक यशवंत डांगे यांनी म्हटले आहे.

आमदार संग्राम जगताप यांनी विधानसभेत नगररचना विभागाच्या कारभारविरोधात तक्रार केली होती. त्याची दखल घेत आयुक्त तथा प्रशासक यशवंत डांगे यांनी गुरुवारी तत्काळ नगररचना विभागाच्या कामकाजाचा व प्रलंबित प्रकरणांचा आढावा घेतला. पोर्टलवर शंभरहून अधिक विविध प्रकारची प्रकरणे प्रलंबित दिसत आहेत. त्यातील बहुतांशी प्रकरणे ऑफलाईन मंजूर झाले आहेत. तसेच, काही प्रकरणांमध्ये त्रुटी काढण्यात आल्या आहेत. त्याची पूर्तता संबंधितांनी केलेली नाही. त्यामुळे ही प्रकरणे प्रलंबित आहेत. सद्यस्थितीत ४० ते ५० प्रकरणे प्रलंबित असून, त्याच्या मंजुरीची प्रक्रिया सुरू असल्याचे आयुक्त तथा प्रशासक यशवंत डांगे यांनी सांगितले.

पोर्टलवर प्रलंबित दिसणाऱ्या प्रकरणांची तपासणी करावी. जी ऑफलाईन मंजूर आहेत, ती प्रकरणे पोर्टलवर प्रलंबित दिसणार नाहीत, याची खातरजमा करावी. त्रुटींची पूर्तता संबंधितांकडून होत नसेल तर ती प्रकरणे मुदत संपल्यावर नामंजूर करावीत. कोणत्याही परिस्थितीत मुदतीतच परवानग्या दिल्या जातील, याची दक्षता घ्यावी. त्यासाठी ऑफलाईन छाननी करून मगच ते ऑनलाईन दाखल होतील, याची दक्षता घ्यावी. प्रकरणे प्रलंबित दिसल्यास संबंधितांवर कारवाई करण्यात येईल, असा इशाराही आयुक्त तथा प्रशासक यशवंत डांगे यांनी दिला आहे.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles