Wednesday, October 29, 2025

आमदार संग्राम जगताप यांचा पोलीस अधीक्षकांना थेट प्रश्न, पोलीस संरक्षणासाठी की नागरिकांना लुटण्यासाठी?

अहिल्यानगर : शहरातील कोतवाली व तोफखाना पोलीस स्टेशन हद्दीमध्ये चोऱ्या दरोडे महिलांच्या गळ्यातील मंगळसूत्र ओढण्याचे प्रकार दिवसेंदिवस वाढले आहे पूर्वीच्या काळामध्ये पोलीस गस्त घालायचे नागरिकांना भेटायचे चौकात असणाऱ्या वहीवर नोंद करायचे, काही अनुचित घटना घडल्यानंतर तातडीने बीट मार्शल घटनास्थळी जायचे. मात्र आता पोलिसांची कुठली यंत्रणा राहिली नाही त्यामुळे नागरिकांच्या संरक्षणाचा प्रश्न निर्माण झाला आहे तरी पोलीस अधीक्षक राकेश ओला यांनी तातडीने लक्ष घालून घडलेल्या घटनांचा तपास तातडीने लावून गुन्हेगार व चोरांवरपोलिसांचा धाक निर्माण करावा अशी मागणी आमदार संग्राम जगताप यांनी केली.
बुरुडगाव रोड वरील साईनगर भागात होणाऱ्या चोऱ्यांचा व दरोड्यांचा बंदोबस्त करण्याची मागणी पोलीस अधीक्षक राकेश ओला यांच्याकडे नागरिकांनी निवेदनद्वारे केली यावेळी आ.संग्राम जगताप, मा.उपमहापौर गणेश भोसले, प्रकाश भागानगरे, संजय चोपडा, डॉ.महेश वीर, राजेश भंडारी, आदेश चंगेडिया, योगेश चंगेडिया, राजेंद्र बलदोटा, सतीश देसरडा, राजेंद्र मुथा, बाबुशेठ बोरा, संजय राका, डॉ.मुकुंद खासे, संदेश कटारिया, पंकज पटेल, समीर मुथा, रवींद्र शेलोत, अभय लुनिया आदी सह नागरिक उपस्थित होते.
आ.संग्राम जगताप पुढे म्हणाले की शहर पूर्वी ११ वाजता बंद केले जायचे! मात्र आता नाईटला परवानगी दिली काय? असा प्रश्न आम्हाला पडला आहे. रात्री तीन ते चार वाजेपर्यंत शहरांमध्ये वर्दळ दिसती काही वेगळ्या विचाराचे लोक बस स्थानकावर फिरत असतात यांचे काय काम असते? हे कुठल्यातरी वेगळ्या भागात राहत असतात हेच खरे दरोडेखोर आहे’ पोलिसांनी यांच्या गाडीचे कागदपत्र तपसली पाहिजेत बिगर नंबर प्लेटच्या गाड्यावर फिरत असतात. पोलिसांनी यांना तपासले पाहिजे, शहरात गस्त वाढवली पाहिजे, जे पोलीस स्टेशनचे प्रमुख अधिकारी आहेत यांच्या भवताली जे कर्मचारी गोळा झाले आहे ते फक्त अवैद्य धंद्याशी संपर्क असणारी लोक आहे. यांचे पुरावे आमच्याकडे आहेत पीआय लोकांना जेवायला घेऊन जातात आणि तिथे डिलिंग करतात अशी माहिती पोलीस अधीक्षकांना सांगितली असून त्या कर्मचाऱ्यांवर कारवाईची मागणी केली आहे. त्यांच्या त्या ठिकाणाहून बदली करणे गरजेचे असून कोतवाली पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक दराडे व तोफखाना पोलीस स्टेशनचे पीआय कोकरे यांच्या बाजूने असणारा कर्मचारी वर्ग हा तडजोडी करणारा आहे. यांचे शहरात मोठे रॅकेट असून हे फक्त पैसे गोळा करण्यासाठी फिरतात, मात्र चोऱ्या करणारे, दरोडे घालणारे, महिलांच्या गळ्यातील मंगलसूत्र वर पळवणारे, यांच्यावर पाय बंद घालने आवश्यक आहे. साईनगर परिसरातील योगेश चंगेडिया यांच्या घरी दरोडा घालण्याच्या तयारीत असणाऱ्या चोरांना नागरिकांच्या सतरतेमुळे पळून जावे लागले. यामध्ये कुठलेही पोलिसांचे योगदान नाही पोलीस उलट तासभराने आले पोलीस अधिकारी व कर्मचारी गॅंगवर कारवाई करण्याची मागणी पोलीस अधीक्षक राकेश वाला यांच्याकडे केली आहे. जर अधीक्षकांनी कारवाई केली नाही तर लोकशाही मार्गाने राज्य शासनाकडे तक्रार करावी लागेल, पोलीस स्टेशनमध्ये नेमलेले अधिकारी व कर्मचारी नागरिकांच्या संरक्षणासाठी आहे की लोकांना लुटण्यासाठी आहे! हा प्रश्न जनतेच्या मनामध्ये निर्माण झाला आहे. कापड बाजारातील दुकान खाली करण्याकरता लोक येतात त्याची तोडजोड करण्याचे काम पोलीस स्टेशनमध्ये होते. तोडजोड करणारी गॅंग पोलिसांची तयार झाली आहे. यांच्यावर कारवाई करण्याची आवश्यकता आहे. जिल्ह्यामध्ये व शहरांमध्ये हे काय चालले आहे, या पोलिसांवर कोणाचा धाक आहे की नाही, हे सुद्धा तपासणीची वेळ आपल्यावर आली आहे. घडलेल्या घटनांचा तपास पूर्ण होत नसेल तर पोलिसांसमोर मोठे आव्हान आहे ते न स्वीकारता दिवसभर कलेक्शन करण्यात पोलीस व्यस्त आहे, या घटना शासनाच्या निदर्शनास आणून द्याव्या लागतील असे मत आमदार संग्राम जगताप यांनी व्यक्त केले.
पुढे निवेदवनात म्हटले आहे की, साईनगर बुरुडगांवरोड परिसर हा अनेक रहिवाशांनी गजबजलेला आहे तेथे अनेक बंगले व फ्लॅटधारक रहिवास वास्तव्य करीत आहेत. गेली ६ ते ८ महिन्यापासून सदर परिसरामध्ये चोरट्यांनी खुप मोठ्या प्रमाणात धुमाकुळ घातलेला आहे त्याबाबत कोतवाली पोलिस स्टेशन, येथे एफ.आय.आर. दाखल आहे. याबाबतीत अनेक वेळेस पोलिसांना सांगुन देखील याचा योग्य तो तपास होत नाही व त्याबाबत निष्काळजीपणा होत आहे. यातुन खुप मोठा शारिरीक व आर्थिक धोका निर्माण होऊन मनुष्य होनी होण्याची खुप मोठी शक्यता निर्माण झालेली आहे. नुकतेच ६ महिन्यापुर्वी रवि शिलोत यांच्या बंगल्यामध्ये मोठा दरोडा करुन खुप मोठी आर्थिक नुकसान झाली, त्याचा कुठलाही तपास अद्याप पावेतो झालेला नाही. रस्त्याने जाताना बऱ्याच छोट्या-मोठ्या चोऱ्या होत आहेत, त्यामध्ये मंगळसुत्र हिसकावुन घेणे, सोनेनाणे पैसे आडके हिसकावुन घेणे अशा अनेक चौऱ्या होत आहे. त्यामुळे येथे कायदा व सुव्यवस्थेचा खुप मोठा प्रश्न निर्माण झालेला आहे. सदर परिसरामध्ये उद्योजक, प्रतिष्ठीत व्यापारी यांचे राहत आहेत. नुकतेच २ दिवसापुर्वी योगेश चंगेडिया रा. साईनगर यांच्या येथे रात्री ३.०० वाजता दरवाजा फोडण्याचा प्रयत्न चालु असतांना घरातील लोक उठुन त्यांनी शेजारी पाजारी मित्रांना फोन केले व चोर-चोर अशी मोठ्याने आरडा ओरड झाल्यामुळे सदर ५ चोर त्यांनी चोरलेली मारुती व्हॅन तेथेच सोडुन पोबारा केला व सदर मारुती व्हॅनमध्ये खुप मोठ-मोठी हत्यारे होती. त्या मध्ये नशिबाने मनुष्यहानी व आर्थिक हानी सतर्कतेमुळे वाचली, परंतू सदर परिसरामध्ये अशा चोरांचा खुप मोठा सुळसळाट होऊन त्यांचा तेथे वावर रात्री बेरात्री चालु आहे. पोलिस स्टेशन यांना सदर घटनेच्या वेळी फोन केला असता त्यांनी त्याची वेळीच दखल घेतली नाही! सदर दखल वेळीच घेतली असती तर सदर दरोडेखोर सापडुन आले असते व त्यांचेवर मोठा वचक बसला असता याची पण आपणामार्फत योग्य ती चौकशी होणे गरजेचे आहे. अश्या अतिशय भयावक अशा परिस्थितीमध्ये आपणामार्फत योग्य ते आदेश होऊन सर्व योग्य तो तपास व्हावा व त्याबाबतीत कडक कारवाई करण्याचे निर्देश देण्यात यावेत. तसेच रोज रात्री सदर परिसरामध्ये कोतवाली पोलिस स्टेशन मार्फत अथवा आपल्या योग्य त्या यंत्रणेमार्फत पेट्रोलिंग (गस्त) रोज चालु ठेवण्याचे, आदेश आपणामार्फत देण्यात यावे जेणे करुन आर्थिक व जीवत हानी टळु शकते व चोरांवर व दरोडेखोरांवर वचक बसुन आम्हास न्याय मिळू शकतो. तरी आम्ही खाली सह्या करणार साईनगर परिसर व व्यापारी सर्वजण आपणास निवेदन देतो की, आपण याबाबतीत योग्य ती दखल घ्यालच अशी अपेक्षा ठेवतो व त्याबाबतीत आपण त्वरीत निर्देश देऊन आपणही स्वतः सदर ठिकाणी विजीट देणे आवश्यक आहे असे निवेदवनात म्हटले आहे.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles