Saturday, February 21, 2026

आमदार संग्राम जगताप आमदार व्हावेत म्हणून नगर मधील कार्यर्कत्याची नवस पूर्ती पुर्ण

अक्कलकोट येथील स्वामी समर्थ मंदिरातील अन्नदान सेवेला एक लाखांची देणगी

नगरमधील गणेश दातरंगे यांनी केला होता आमदार संग्राम जगताप यांच्यासाठी नवस

अहिल्यानगर : आमदार संग्राम जगताप आमदार व्हावेत म्हणून नगर मधील गणेश दातरंगे यांनी अक्कलकोटच्या स्वामी समर्थांना साकडे घातले होते अन्नदानाचा नवस केला होता. त्या नवसाची पूर्ती गुरुवारी करण्यात आली. अक्कलकोट येथील स्वामी समर्थ मंदिर ट्रस्टच्या अन्नदान सेवा केंद्रात एक लाख रुपयांची देणगी देऊन गणेश दातरंगे यांनी नवस पुर्ण केला. आ. संग्राम जगतापा यांचा स्वभाव, राजकारणाची पध्दत आणि त्यांचा साधेपणा हा अगदी लहान मुलांपासून अबालवृध्दांपर्यंत सर्वांनाच भावतो. साधारणपणे महापौर असल्यापासून ते आजतागायतपणे त्यांनी सामान्य माणसाची नाळ तूटू दिली नाही. केवळ राजकारणासाठी राजकारण न करता प्रत्येकाच्या सुख-दुःखात आ. जगताप धावून जात असल्याने त्यांचे नगर शहरातील प्रत्येक कुटूंबाशी आपुलकीचे नाते निर्माण झाले आहे.
2025 च्या विधानसभा निवडणुकीदरम्यान आ. संग्राम जगताप हे महायुतीच्या बरोबर होते. लोकसभेनंतर महाराष्ट्रात महाविकास आघाडीचे वारे जोरात होते. ही निवडणूक फार चुरशीची होईल असे वाटत असताना सामान्य कार्यकर्ता आणि शहरातील प्रत्येक भागातील गोरगरिब जनता मात्र जगताप यांच्या पाठीमागे खंबीरपणे उभी होती. अशा संकटाच्या काळात आपल्या नेत्याला पुन्हा आमदार करण्यासाठी सामान्य कार्यकर्त्यांनी प्रयत्न केले. काहींनी नवस केले. असाच नवस नगर मधील गणेश दातरंगे यांनी अक्कलकोट येथील स्वामी समर्थांच्या चरणी केला होता. आणि तो नवस गुरुवारी अक्कलकोट येथे आ. संग्राम जगताप यांच्यासह जाऊन दातरंगे यांनी पूर्ण केला. यावेळी अभिजीत रोहोकले, अनिरुद्ध भोर,अभिजीत वाघ,बाबू ठाणगे,संजय बोरुडे, विकी वाघ उपस्थित होते. तर आता दरवर्षी आमदार संग्राम जगताप यांच्या वाढदिवसादिवशी अन्नदान होणार आहे. कार्यकर्त्यांच्या प्रेमामुळे आमदार संग्राम जगताप भारावून गेले होते. यावेळी आमदार संग्राम जगताप, सुरेश बनसोडे,अभिजित खोसे, सागर गुंजाळ, मळू गाडळकर, विजय सुंबे, संतोष ढाकणे, भागवत कुरधने, अंकुश मोहिते, सुहास शिरसाठ, सोनू घेंबुड, नितीन लिंबोरे आदी उपस्थित होते.
गणेश दातरंगे यांनी 2025 च्या विधानसभा निवडणुकीदरम्यान माझ्या विजयासाठी केलेला नवस फेडण्यासाठी आज येथे आलो आहे तसेच जो नवस केला त्यामुळे माझ्या सारख्या सामान्य कुटूंबातील सुपुत्राला संपुर्ण नगर शहर प्रचंड प्रेम करतोय, हे खरंच माझे भाग्य आहे. अशी प्रतिक्रिया आमदार जगताप यांनी दिली.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles