Thursday, February 19, 2026

राज ठाकरेंच्या मनात नेमकं काय?.. अचानक उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या भेटीला

मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची भेट घेतली आहे, राज ठाकरे यांनी एकनाथ शिंदे यांचं निवासस्थान असलेल्या नंदनवन बंगल्यामध्ये जाऊन एकनाथ शिंदे यांची भेट घेतली आहे. यावेळी एकनाथ शिंदे यांनी राज ठाकरे यांचा सत्कार केला. या भेटीदरम्यान दोन्ही नेत्यांमध्ये बंददाराआड चर्चा झाली आहे.

ठाकरे बंधूंनी युती करुन महापालिका निवडणुका लढवल्या. पण एकाही पालिकेत त्यांच्या महायुतीला सत्ता मिळाली नाही. मुंबईतही शिवसेना उबाठा-मनसे युती बहुमतापासून बरीच लांब राहिली. मुंबईत युतीचा फायदा उद्धव ठाकरे यांनाच अधिक झाल्याची चर्चा झाली. मनसेला केवळ सहा जागा मिळाल्या. तर शिवसेना उबाठाला ६५ जागांवर यश मिळालं.

महापालिका निवडणुकांचे निकाल लागताच कल्याण-डोंबिवलीत मनसेनं शिंदेसेनेला पाठिंबा दिला. शिंदेंच्या बालेकिल्ल्यात सेना-मनसेचे सूर जुळले. यानंतर दोन्ही नेत्यांची झालेली भेट महत्त्वाची मानली जात आहे.

राज ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांच्या गाठीभेटी, बैठका याआधीही झालेल्या आहेत. पण ठाकरे बंधूंची युती झाल्यानंतर राज ठाकरे प्रथमच एकनाथ शिंदे यांच्या भेटीला गेले आहेत.

आता झालेली राज ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांची भेट याच लवचिक भूमिकेची भाग आहे का, अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरु झाली आहे.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles