Tuesday, February 24, 2026

नगर तालुक्यातील मोनिका झरेकरची सहाय्यक उपप्रादेशिक परिवहन अधिकारीपदी निवड

मोनिका झरेकरची सहाय्यक उपप्रादेशिक परिवहन अधिकारीपदी निवड
नगर (प्रतिनिधी)- महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोग २०२३ मार्फत सहाय्यक उपप्रादेशिक परिवहन अधिकारी (वर्ग एक) पदासाठी घेतलेल्या परीक्षेतून खातगाव टाकळी (ता. नगर) येथील रहिवाशी मोनिका बाळासाहेब झरेकरची निवड झाली आहे. मंत्रालय कक्ष अधिकारी, विक्रीकर निरीक्षक, वजन-मापे निरीक्षक अधिकारी आणि कर व प्रशासकीय अधिकारी नगरपरिषद अशा चार पदांसाठी तिची यापूर्वी निवड झाली होती.
मोनिका झरेकरचे प्राथमिक शिक्षण ऑक्सिलियम कॉन्व्हेंट लोणावळा (जि.पुणे) येथे झाले. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयातून मेकॅनिकल इंजिनिअरिंग या विषयात पदवी घेतली. त्यानंतर काही काळ एका खासगी कंपनीत काम केले. महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोगामार्फत प्रशासकीय सेवेत येण्याचा निर्धार करून परीक्षेच्या अभ्यासाला सुरूवात केली. जिद्ध व चिकाटी असल्यामुळे आणि कुटुंबाची साथीमुळे उच्च पद प्राप्त केले.
तळेगाव दाभाडे (जि. पुणे) येथे कर व प्रशासकीय अधिकारी म्हणून कार्यरत आहे. या कालावधीत सहाय्यक उपप्रादेशिक परिवहन अधिकारी (वर्ग एक) पदासाठी दिलेल्या परीक्षेद्वारे निवड झाली आहे. मोनिकाचे वडील बाळासाहेब झरेकर हे नौदलातून नुकतेच सेवानिवृत्त झाले आहेत. राष्ट्रपती आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त बबनराव झरेकर आणि नौदलातील सेवानिवृत्त अधिकारी रघुनाथ झरेकर यांची ती पुतणी आहे. अहिल्यानगर जिल्हा परिषदेचे सेवानिवृत्त उपमुख्य कार्यकारी अधिकारी सुरेश शिंदे यांची ती भाची आहे.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles