अहिल्यानगर जिल्हा परिषदेत आणखी बोगस दिव्यांग शिक्षक आढळले

अहिल्यानगर-जिल्हा परिषदेत बोगस दिव्यांग कर्मचार्‍यांची संख्या दिवसेंदिवस वाढतच आहे. दोन आठवड्यापूर्वी 15 बोगस दिव्यांग कर्मचार्‍यांवर निलंबनाची कारवाई केल्यानंतर आता पुन्हा तीनजणांचे दिव्यांग प्रमाणपत्र 40 टक्केपेक्षा कमी आढळले आहे. हे तिघेही शिक्षक असून त्यांचा खुलासा मागवल्यानंतर त्यांच्यावर पुढील कारवाई होणार आहे.

जिल्हा परिषद प्रशासनाने नाशिक या ठिकाणी जिल्ह्यातील 41 दिव्यांग शिक्षकांची यादी तयार करून ते खरोखर दिव्यांग आहे की नाहीत, याची पडताळणी केली होती. या पडताळणीचा अहवाल जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी आनंद भंडारी यांच्याकडे प्राप्त झाला असून यात 3 बोगस लुळे-पांगळे गुरूजी सापडले आहेत. राज्यभर दिव्यांग कर्मचारी तपासणीचे आदेश दिव्यांग मंत्रालयाचे सचिव तुकाराम मुंडे यांनी दिल्यानंतर अहिल्यानगर जिल्हा परिषदेने आपल्या दिव्यांग कर्मचार्‍यांची तपासणी अहिल्यानगर जिल्हा रूग्णालय व नाशिक येथील आरोग्य उपसंचालक कार्यालयाकडून करून घेतली.जिल्हा रूग्णालयाने 106 दिव्यांग कर्मचार्‍यांची तपासणी दोन महिन्यांपूर्वी केली होती. त्याचा अहवाल आल्यानंतर त्यातील 18 जणांचे दिव्यांगत्व 40 टक्केपेक्षा कमी झाले होते. त्यातील 15 जणांवर सीईओंनी निलंबनाची कारवाई केली होती. एकाचा खुलासा मान्य करण्यात आला, तर दोघांच्या खुलाशावर फेरविचार होणार होता. दरम्यान, जिल्हा परिषदेने 41 अल्पदृष्टी दिव्यांगांना तपासणीसाठी नाशिक आरोग्य उपसंचालक कार्यालयाकडे पाठवले होते. त्याचा अहवाल आता प्राप्त झाला असून त्यात तीन कर्मचारी बोगस आढळले आहेत. त्यात तिघांचे प्रमाणपत्र 40 टक्क्यांपेक्षा कमी आढळले आहे. हे तिघेही शिक्षक आहेत.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles