Thursday, November 6, 2025

२ हजारपेक्षा जास्त सरकारी महिलांनी लाटले लाडक्या बहिणीचे पैसे; सरकार करणार कारवाई

लाडकी बहीण योजनेत महिलांच्या अर्जांची पडताळणी सुरु झाली आहे. लाडकी बहीण योजनेत महिलांनी बोगस पद्धतीने अर्ज केले आहेत. अपात्र महिलांनीदेखील अर्ज केलेले आहेत. लाडकी बहीण योजनेत सरकारी कर्मचारी असलेल्या महिलांनीही अर्ज केले आहेत. यामध्ये २६५२ महिला कर्मचाऱ्यांचे अर्ज बाद करण्यात आले आहे. या महिलांनी पैसे लाटले आहेत. २ हजारपेक्षा जास्त सरकारी महिलांनी कर्मचाऱ्यांनी लाडकी बहीण योजनेचा लाभ घेतला आहे. या महिलांचे अर्ज आता बाद केले आहे. तक्रारी आल्यानंतर पडताळणी केली. यामध्ये या त्रुटी लक्षात आल्या. माहिती व तंत्रज्ञान विभागाला सामान्य प्रशासन विभागाने १ लाख ६० हजार कर्मचाऱ्यांना युआयडी डेटा उपलब्ध करुन दिला. यामध्ये पोर्टलवर कर्मचाऱ्यांची नावे नोंदली होती. यामध्ये किती महिलांनी लाडकी बहीण योजनेचा लाभ घेतला, याची पडताळणी करण्यासाठी मोहिम हाती घेतली होती. त्यानुसार २६५२ सरकारी महिलांच्या खात्यात पैसे गेल्याचे निदर्शनास आले.

सरकारी कर्मचाऱ्यांना लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळणार, असं निकषांमध्ये लिहलं आहे. तरीही अर्ज भरले आणि त्याचा लाभ उचलला. त्यामुळे त्यांची तपासणी करण्यात आली. जवळपास ६ लाख कर्मचाऱ्यांची तपासणी करण्यात येणार असल्याचे सांगितले आहे.

८ लाख ८५ हजार महिलांनी नमो शेतकरी आणि लाडकी बहीण अशा दोन्ही योजनांचा लाभ घेतला आहेत. त्यांना लाडकी बहीण योजनेत महिन्याला १५०० आणि नमो शेतकरी योजनेत वर्षाला सहा हजार रुपये मिळतात. या दोन्ही योजनांचा लाभ घेणाऱ्या महिलांच्याही अर्जांची पडताळणी केली आहे. त्यांना लाडकी बहीण योजनेअंतर्गत फक्त ५०० रुपये मिळणार आहे.

सरकारी कर्मचारी असलेल्या महिलांनी लाडकी बहीण योजनेचा लाभ घेतला. त्यावर गिरीष महाजनांनी प्रतिक्रिया दिली आहे. मला वाटतं त्याची आता तपासणी सुरू आहे.. काही सरकारी कर्मचारी असतील काही इन्कम टॅक्स भरणाऱ्या असतील त्यांची नावे त्यात आली आहेत. चुकीच्या पद्धतीने त्यांनी योजनेचा फायदा घेतला असेल त्यांना आता फायदा मिळणार नाही त्यांना आता योजनेतून बाद केली.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles