Saturday, February 21, 2026

सलग तीन मॅचमध्ये अपयश, अभिषेक शर्माला संघाबाहेर ठेवणार; टीम इंडियाचा कोच समोर आला अन् म्हणाला…

भारताचा टी 20 मधील सलामीवीर आणि आंतरराष्ट्री टी 20 क्रिकेट रँकिंगमध्ये पहिल्या स्थानावर असलेला अभिषेक शर्मा सध्या चर्चेत आहे. अभिषेक शर्मा ग्रुप स्टेजमध्ये तीन सामन्यात तीन डावात खातं उघडू शकला नव्हता. अभिषेक शर्माचा फॉर्म खराब असल्या कारणामुळं त्याला सुपर 8 मध्ये भारतीय संघात स्थान मिळणार नाही, अशा चर्चा सुरु होत्या. सुपर -8 मध्ये भारताचा पहिला सामना 22 फेब्रुवारीला दक्षिण आफ्रिकेविरुद्ध होणार आहे. अभिषेक शर्मा संदर्भातील चर्चा वाढण्यापूर्वी टीम इंडियाचे गोलंदाजी प्रशिक्षक मोर्ने मोर्केल यांनी स्पष्टीकरण दिलं आहे.टीम इंडियाचे गोलंदाजी प्रशिक्षक मोर्ने मोर्केल यांनी अभिषेक शर्मा संदर्भात महत्त्वाची अपडेट पत्रकार परिषदेत दिली आहे. अभिषेक शर्माला संघाबाहेर ठेवण्यासंदर्भातील चर्चांवर त्यांनी भाष्य केलं. “अभिषेक शर्माला संघातून वगळण्यासंदर्भात कोणतीही चर्चा झालेली नाही. आम्हाला विश्वास आहे की तो चांगली कामगिरी करुन दाखवेल. तो नेट्समध्ये बॉलला चांगल्या प्रकारे हिट करत आहे. तो नक्की कमबॅक करेल”,असं मोर्ने मोर्केल म्हणाले.

अभिषेक शर्मा या टी 20 वर्ल्ड कपमध्ये अपयशी ठरला आहे. अमेरिका, पाकिस्तान आणि नेदरलँडस विरुद्ध अभिषेक शर्माला एकही रन करता आली नाही. अमेरिकेविरुद्धच्या सामन्यात अभिषेक शर्मा आजारी असून देखील फलंदाजीसाठी मैदानात उतरला होता. मात्र, त्यानंतर नामिबिया विरुद्धच्या सामन्यात तो खेळला नव्हता. पाकिस्तान आणि नेदरलँडस विरुद्ध देखील तो धावा करु शकला नाही.

अभिषेक शर्मा सध्या खराब फॉर्मचा सामना करत आहे. 7 टी 20 सामन्यांपैकी पाच डावात अभिषेक शर्मा शुन्यावर बाद झाला आहे. या वर्षी अभिषेक शर्मानं 8 डावात 182 धावा केल्या आहेत. राहिलेल्या तीन डावात अभिषेक शर्मानं 2 अर्धशतकं केली आहेत. ज्यात त्याचा स्ट्राईक रेट 224 च्या वर राहिला आहे.

दरम्यान, भारतासमोर सुपर 8 मध्ये दक्षिण आफ्रिका, वेस्ट इंडिज आणि झिम्बॉब्वेचं आव्हान आहे.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles