अहिल्यानगर जिल्ह्यात यात्रेतून मोटारसायकल चोरी करणारी टोळी जेरबंद

अहिल्यानगर- जिल्ह्यात वाढलेल्या मोटारसायकल चोरीच्या घटनांना आळा घालण्यात स्थानिक गुन्हे शाखेला मोठे यश मिळाले आहे. मढी यात्रा तसेच इतर ठिकाणांहून मोटारसायकल चोरी करणार्‍या टोळीला जेरबंद करण्यात आले असून, चार आरोपींना अटक करून त्यांच्या ताब्यातून १२ मोटारसायकली जप्त करण्यात आल्या आहेत. यासोबतच ७ गुन्ह्यांची उकल करण्यात पोलिसांना यश आले आहे.

या प्रकरणी फिर्यादी दत्तात्रय भागवत म्हस्के (वय २८, रा. रणकईवाडी, ता. पाथर्डी) यांनी ८ मार्च २०२६ रोजी रेणूकाईवाडी परिसरातून त्यांची मोटारसायकल (एसएच १६ सीएल १३६५) चोरीस गेल्याची तक्रार दाखल केली होती. या घटनेवरून पाथर्डी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला होता.

दरम्यान, जिल्ह्यात वाढत्या चोरीच्या घटनांची दखल घेत पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांनी स्थानिक गुन्हे शाखेला आरोपींचा शोध घेण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार पोलीस निरीक्षक किरणकुमार कवाडी यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष पथक तयार करण्यात आले. दि. १२ एप्रिल २०२६ रोजी गुप्त माहितीच्या आधारे श्रीरामपूर तालुयातील अशोकनगर परिसरात सापळा रचण्यात आला. रेल्वे पुलाजवळ दोन मोटारसायकलवर आलेल्या चार संशयितांना ताब्यात घेण्यात आले. चौकशीदरम्यान आरोपींनी आपली नावे महेश मारुती कांदळकर, अजय रेवजी कांदळकर, जावेद समद बेग आणि विकास बाळासाहेब जाधव अशी सांगितली. प्राथमिक चौकशीत आरोपींनी ताब्यातील मोटारसायकली चोरीच्या असल्याची कबुली दिली. पुढील चौकशीत त्यांनी मढी यात्रा, पाथर्डी, देहरे टोलनाका तसेच संगमनेर तालुयातील विविध ठिकाणांहून आणखी मोटारसायकली चोरी केल्याचे उघड झाले.

आरोपींकडून एकूण ३ लाख ५३ हजार १०० रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. यामध्ये १२ मोटारसायकली, ५ मोबाईल फोन आणि चोरीसाठी वापरलेले साहित्य यांचा समावेश आहे.तपासादरम्यान आरोपींकडून पाथर्डी, संगमनेर आदी पोलीस ठाण्यांतील एकूण ७ गुन्हे उघडकीस आले आहेत. अटक करण्यात आलेल्या आरोपींना मुद्देमालासह पाथर्डी पोलीस ठाण्यात हजर करण्यात आले असून पुढील तपास सुरू आहे.ही कारवाई पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक किरणकुमार कबाडी यांच्या आदेशानुसार सपोनि हरिष भोये, पोसई संदिप मुरकुटे, पोलीस अंमलदार दिपक घाटकर, सुरेश माळी, अतुल लोटके, विष्णु भागवत, फुरकान शेख, बाळासाहेब नागरगोजे, रिचर्ड गायकवाड, रमिजराजा आत्तार, विशाल तनपुरे, प्रशांत राठोड, अमृत आढाव, बाळासाहेब गुंजाळ, भगवान थोरात, योगेश कर्डिले, प्रकाश मांडगे, सोनल भागवत, भगवान धुळे, अरुण मोरे यांच्या पथकाने यशस्वीपणे पार पाडली.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles