Thursday, February 19, 2026

उदय सामंत एका मोठ्या गटासह भाजपमध्ये चाललेत…दावोसमध्ये चर्चा

शिवसेना ठाकरे गटाचे नेते अंबादास दानवे हे तुम्हाला लवकरच आमच्या सोबत दिसतील. आमच्या सोबत येण्याची त्यांची प्रोसेस सुरू झाली आहे, असा दावा उद्योगमंत्री आणि शिवसेना शिंदे गटाचे नेते उदय सामंत (Uday Samant) यांनी केलाय. उदय सामंत यांच्या वक्तव्यानंतर राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे. आता शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी एक खळबळजनक दावा केलाय.

संजय राऊत म्हणाले की, अंबादास दानवे हे कडवट शिवसैनिक आहेत. ते गेल्या अनेक वर्षांपासून एकाच पक्षात आहेत. त्यांनी तीन-चार पक्ष बदलले नाहीत. ते आमचे सहकारी आहेत. या दाव्यांना अर्थ नाही. स्वतः उदय सामंत एका मोठ्या गटासह भाजपमध्ये चालले आहेत. दावोसमध्ये काय चर्चा झाली हे तुम्हाला माहिती आहे का? असा दावा त्यांनी केला. आता संजय राऊत यांच्या दाव्यावर उदय सामंत काय बोलणार? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

राऊत म्हणाले की, शिंदे गटाला पंतप्रधान नरेंद्र मोदी, अमित शाह हे वंदनीय आहेत. कोश्यारी यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा अवमान केला. पण, शिंदे गटाकडून निषेधाचा एक शब्द नाही. शिंदे सेनेला बाळासाहेब वंदनीय नाही. शिंदेंची शिवसेना ही भाजपचं अंगवस्त्र आहे. किती दिवस रुसून बसणार असा सवाल त्यांनी केला. फारतर एखादी साडीचोळी पदरात पाडून घेतली, असा टोला राऊतांनी शिंदे गटाला लगावला.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles