Thursday, February 19, 2026

खासदार सुप्रिया सुळे यांनी जावयाचे फोटो शेअर करत दिली माहिती

खासदार सुप्रिया सुळे यांची लेक रेवती सुळे यांचं लग्न ठरलं आहे. नागपूरचे प्रसिद्ध उद्योगपती अरुण लखानी यांचे सुपूत्र सारंग लखानी यांच्याबरोबर रेवती विवाहबंधनात अडकणार आहेत. सुप्रिया सुळे यांचा मुलगा विजय सुळे आणि त्यानंतर सुशीलकुमार शिंदे यांची मुलगी स्मृती शिंदे यांनी या लग्नाबाबत सोशल मीडियावर पोस्ट केल्यानंतर आता खुद्द सुप्रिया सुळे यांनी होणाऱ्या जावयाचे फोटो सोशल मीडियावर पोस्ट करत या लग्नाची माहिती दिली आहे.

सुप्रिया सुळे यांचा मुलगा विजय सुळे यांनी सोशल मीडियाद्वारे पोस्ट करत रेवती आणि सारंगच्या लग्नाची माहिती दिली होती. तसंच, माजी मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदे यांची कन्या स्मृती शिंदे यांनीही रेवती सुळे यांच्या लग्नाची माहिती सोशल मीडियाद्वारे दिली होती. तेव्हापासून त्यांच्या लग्नाची जोरदार चर्चा सुरू आहे.

सुप्रिया सुळे यांनीही थेट जावयाचे फोटो शेअर करत त्याच्या आई-वडिलांचीही माहिती दिली. सुप्रिया सुळे पोस्टमध्ये म्हणाल्या, “सांगायला अतिशय आनंद होत आहे की आमची मुलगी रेवती हिचा विवाह अरुण लखानी आणि वंदना लखानी यांचा सुपूत्र सारंग याच्याशी निश्चित झाला आहे.”

सुप्रिया सुळे यांचे होणारे जावई सारंग अरुण लखानी हे विश्वराज ग्रुपचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक अरुण लखानी यांचे पुत्र आहेत. सारंग अरुण लखानी हे बॅडमिंटनपटूही आहेत. त्यांनी राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये सहभाग घेतला आहे.

तर, रेवती सुळे हिने प्रतिष्ठित ‘लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स’मधून पदवी पूर्ण केली आहे.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles