Saturday, February 21, 2026

सुप्रिया सुळेंनी WhatsApp स्टेटसमध्ये मनाची अवस्था सांगितली, म्हणाल्या…

उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा विमान अपघातात दुर्दैवी मृत्यू झाला. जिल्हा परिषद निवडणुकांच्या प्रचार सभांच्या निमित्ताने अजित पवार मुंबईहून बारामती दौऱ्याला निघाले होते. मात्र बारामतीत विमान लँड करताना अपघात होऊन विमानाने पेट घेतला. यामध्ये अजित पवार यांच्यासह विमानातील पाचही जणांचा मृत्यू झाला. वयाच्या अवघ्या 66 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. अजित पवार यांच्या निधनाने पवार कुटुंबासह राष्ट्रवादीच्या समर्थकांवर शोककळा पसरली आहे. अजित पवार यांच्या भगिनी आणि लोकसभा खासदार सुप्रिया सुळे यांची अवस्था बिकट झाली असून त्यांचे व्हॉट्सअप स्टेटस समोर आलं आहे.

‘डिवास्टेटेड’ अर्थात उद्ध्वस्त अशा एका शब्दात सुप्रिया सुळे यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. खरं तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात फूट पडल्यानंतर पवार कुटुंबातही दुही आली. परंतु नुकत्याच झालेल्या महापालिका निवडणुकांना पुणे आणि पिंपरी चिंचवड येथे दोन्ही राष्ट्रवादी एकत्र सामोऱ्या गेल्या. काही काळापूर्वी अजितदादांचे धाकटे पुत्र जय पवार यांचे बहारीनमध्ये लग्न झाले. त्यानंतर पवार कुटुंबही एकत्र झाल्याचं चित्र दिसलं. शरद पवार यांच्यासोबतच अजितदादाही कुटुंबातील प्रमुख कर्त्या पुरुषांपैकी एक झाले.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles