Friday, February 20, 2026

भिंगार अर्बन बँकेला दणका….. झोडगे यांचे सभासदाचा सर्वसाधारण सभेचा सभासदत्व रद्दचा ठराव फेटाळला

भिंगार अर्बन को-ऑप बँकेचे सभासद मुकेश झोडगे यांचे सभासदत्व कायम

भिंगार अर्बन बँकेला दणका,सर्वसाधारण सभेचा सभासदत्व रद्दचा ठराव फेटाळला

अप्पर निबंधक सहकारी संस्था पुणे यांचा आदेश

नगर प्रतिनिधी : भिंगार अर्बन को-ऑप बँक लि. भिंगार ही महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम १९६० अंतर्गत नोंदविण्यात आलेली संस्था आहे. भिंगार अर्बन को-ऑप बँक लि, भिंगार या संस्थेने सभासद मुकेश रमेश झोडगे यांचे सभासदत्व रदद करणेबाबतच्या वार्षिक सर्वसाधारण सभा दिनांक ३१/०८/२०२४ सभेत ठराव क्र.१३ (२) अन्वये मंजुरी मिळणेबाबत दि.०३/१०/२०२४ रोजीच्या पत्रान्वये प्रस्ताव जिल्हा उपनिबंधक, सहकारी संस्था, अहिल्यानगर या कार्यालयात सादर केला होता. भिंगार अर्बन को-ऑप बँक लि, भिंगार या बँकेने सादर केलेल्या प्रस्तावाच्या अनुषंगाने जिल्हा उपनिबंधक, सहकारी संस्था, अहिल्यानगर या कार्यालयाचे दिनांक २९/१०/२०२४ रोजीच्या पत्रान्वये बँकेचे कार्यक्षेत्र राज्य असुन सदर बँकेचे निबंधक हे कार्यालय असल्याने बँकेने सादर केलेला प्रस्ताव आवश्यक त्या कार्यवाहीसाठी या कार्यालयात सादर केला होता. ११५ व्या वार्षिक सर्वसाधारण सभेतही फेटाळण्यात आला होता. या नंतर मुकेश रमेश झोडगे यांनी सभेत गैरवर्तन केल्याने, सभेत उपस्थित सदस्यांनी त्यांचे सभासदत्व कायमचे रदद करुन, शेअसची रक्कम रिझर्व्ह फंड खाती वर्ग करण्यात यावी, अशा आशयाचा प्रस्ताव जिल्हा उपनिबंधक, सहकारी संस्था, अहिल्यानगर या कार्यालयास पाठविण्यात आला होता.
सदर प्रकरणी सभासदाला म्हणने मांडण्याची संधी दिल्याचे दिसून येत नाही. भिंगार अर्बन को-ऑप बँक लि, भिंगार या बँकेने मुकेश रमेश झोडगे यांना सभासदत्व रदद करण्याबाबत कोणतीही नोटीस बँकेकडून देण्यात आलेली नाही.
अप्पर निबंधक, सहकारी संस्था (तपासणी व निवडणूका) महाराष्ट्र राज्य, पुणे प्राप्त झालेल्या अधिकासनुसार, भिंगार अर्बन को-ऑप बँक लि. भिंगार या बँकेच्या दिनांक २२/०९/२०२४ रोजी झालेल्या वार्षिक सर्वसाधारण सभेमधील बँकेचे सभासद मुकेश रमेश झोडगे यांचे सभासदत्व रद्द करण्यास संदर्भात ठेवलेला ठराव क्र.१३ (२) महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम १९६० चे कलम ३५ व नियम १९६१ चे नियम २८ व २९ मधील तरतुदीचे पालन न केल्याने अमान्य करण्यात येत आहे. त्यामुळे भिंगार अर्बन को आप बँकेचे मुकेश रमेश झोडगे यांचे सभासत्व पद कायम राहत असल्याचा आदेश मिलिंद आखरे अप्पर निबंध सहकारी संस्था पुणे यांनी काढला आहे
सभासद मुकेश झोडगे म्हणाले की भिंगार अर्बन को-ऑप बँकेचा सभासद असल्यामुळे माझे कायदेशीर आणि नैतीक मार्गाने बँकेच्या हिताचे व बँकेच्या सभासदांच्या हिताचे काम असणे आवश्यक असुन त्या प्रमाणे मी बँकेचे व बॅकेच्या सभासदांचे हित सर्वोतपरी मानुन बॅकेतील बेकायदेशीर व अंदाधुंद कारभारास सडतोड पध्दतीने कायदेशीर सनदशिर मार्गाने प्रमाणिकपणे विरोध करत आलेलो असुन सभासद आणि बॅकेच्या हितासाठी सदैव मी समर्थन केलेले आहे.माझ्या नैतिक व कायदेशीर समर्थनामुळे व माझ्या बेकायदेशीर कृत्यास असणा-या विरोधामुळे बँकेतील अनेक कर्मचारी, पदाधिकारी यांचे घोटाळे बाहेर येण्याची शक्यता निर्माण झाली व त्यांना मनमानेल त्या प्रमाणे वर्तन करण्यास प्रतिबंध होवु लागला. त्यामुळे गेल्या अनेक दिवसापासुन सदरील बेकायदेशीर कृत्य करणारे लोक माझ्या विरोधात कट करस्थान रचत आले आहे.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles