राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या संविधानात पक्षाचे कार्याध्यक्ष प्रफुल्ल पटेल आणि प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी बदल केला असा आरोप आमदार रोहित पवार यांनी केला. राष्ट्रवादी पक्षाच्या संविधानात केलेले बदल रद्द करण्यासाठी सुनेत्रा पवार यांनी पत्र पाठवल्याचा दावाही रोहित पवारांनी केला आहे.
या बदल केलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या नवीन संविधानात पक्षाचा कणा म्हणून ओळखले जाणारे अल्पसंख्याक सेल,सामाजिक न्याय सेल आणि ओबीसी सेल हे काढून टाकण्यात आले आहेत. जुन्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या संविधानात जवळपास ७ फ्रंटल सेल नमूद होते. आत्ता काही दिवसांपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या संविधानात जे बदल करण्यात आले आहेत त्या मधे युवक,विद्यार्थी,महिला आणि सेवादल याच सेलचा उल्लेख पाहायला मिळत आहे. पक्षाच्या संविधान मधे या पद्धतीने बदल करण्यात आला आहे हे समजताच सुनेत्रा पवार यांनी हे सर्व बदल रद्द करण्यात यावे असा पत्र निवडणूक आयोगाला पाठवलं, असा दावाही रोहित पवार यांनी केला आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसच्या संविधानात सुनील तटकरे आणि प्रफुल्ल पटेल यांनी बदल केल्याचा आरोप रोहित पवारांनी केला आहे. या बदलामुळे अल्पसंख्याक, ओबीसी आणि सामाजिक न्याय हे सेल नसल्याचा दावा करण्यात आला आहे.


