Thursday, February 19, 2026

उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार ॲक्शन मोडवर…आज पक्षाच्या बैठकीत महत्वपूर्ण निर्णय!

उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार या सोमवारी मुंबईत दाखल झाल्या आहेत. आज संध्याकाळी ६ वाजता मुंबईतील देवगिरी या शासकीय निवासस्थानी त्यांनी एक महत्त्वाची बैठक बोलवली आहे. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे विधानमंडळ सदस्य उपस्थित राहणार आहे. सुनेत्रा पवारांनी साप्ताहिक बैठक बोलावली आहे. उपमुख्यमंत्री म्हणून कार्यभार स्वीकारल्यानंतर सुनेत्रा पवार यांच्या नेतृत्वाखाली होणारी ही पहिलीच मोठी बैठक आहे.

बैठकीत मंत्री नरहरी झिरवळ यांच्या कार्यालयातील लाचखोरीचे प्रकरणावरही चर्चा केली जाणार आहे. मंत्रालयातील या प्रकरणानंतर झिरवळ चांगलेच अडचणीत आले आहेत. विशेष म्हणजे शनिवार सकाळपासून मंत्री नरहरी झिरवळ नॉट रिचेबल होते, ज्यामुळे राजकीय चर्चांना उधाण आले होते. विरोधी पक्षांनी या प्रकरणावरून आक्रमक पवित्रा घेत झिरवळ यांच्या राजीनाम्याची मागणी लावून धरली आहे. त्यातच आज नरहरी झिरवळ स्वतः सुनेत्रा पवारांची भेट घेणार आहेत. या बैठकीत कोअर कमिटीसमोर त्यांना आपली बाजू मांडावी लागणार आहे. आता झिरवळ प्रकरणात नेमकी सत्यता काय आहे, याचा अहवाल सुनेत्रा पवार आणि कोअर कमिटीचे सदस्य या बैठकीत समजून घेणार आहेत.

बैठकीला पक्षाच्या सर्व विधानसभा आणि विधानपरिषद सदस्यांना उपस्थित राहण्याचे कडक निर्देश देण्यात आले आहेत.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles