Sunday, December 7, 2025

अहिल्यानगर शहरात पाइपलाइन रस्त्यावरील बांधकामांवर महानगरपालिकेचा हातोडा

ओढे नाल्यालगत अतिक्रमण करून बांधलेल्या बांधकामांवर कारवाई सुरू

पाइपलाइन रस्त्यावरील चार बांधकामांवर महानगरपालिकेचा हातोडा

अहिल्यानगर – शहरातील सावेडी उपनगर परिसरातील काही ओढे व नाल्यांच्या लगत संरक्षक भिंती बांधण्यात आल्या आहेत. या अनधिकृत बांधकामांवर महानगरपालिकेने कारवाई सुरू केली आहे. बुधवारी दिवसभरात संरक्षक भिंतींची चार अतिक्रमणे जमीनदोस्त करण्यात आल्याची माहिती आयुक्त तथा प्रशासक यशवंत डांगे यांनी दिली.

महानगरपालिकेने गेल्या दोन महिन्यांपासून शहरातील ओढे व नाल्यांची साफसफाई केली आहे. मोठ्या प्रमाणात गाळ, कचरा काढून प्रवाह मोकळे केले आहेत. नालेसफाई करत असताना पाइपलाइन रस्त्यावरील सिटी प्राइड हॉटेल, शिरसाठ मळा, वैष्णवी कॉलनी परिसरात नाल्यालगत संरक्षक भिंतींची अतिक्रमणे अडथळा ठरत होती. सावेडी प्रभाग समिती कार्यालयाच्या पथकाकडून या ठिकाणी कारवाई करण्यात आली आहे.

सिटी प्राईड हॉटेल ते शिरसाठ मळा रोड वर तीन संरक्षक भिंतींची अतिक्रमणे सावेडी प्रभाग समिती कार्यालयाच्या पथकाकडून कारवाई करून हटवण्यात आली. तसेच, पाईपलाईन रोडवरील वैष्णवी कॉलनी येथे कायम पाणी साठून राहत असल्याने तातडीची उपाययोजना म्हणून येथील छोट्या नाल्यालगत असणारे संरक्षक भिंतीचे अतिक्रमणही हटविण्यात आले आहे. ज्या ठिकाणी नालेसफाई करताना अडथळे येत आहेत, पाण्याचे प्रवाह अडथळ्यांमुळे अडलेले आहेत, अशा ठिकाणी पाण्याचे प्रवाह मोकळे करण्यासाठी आवश्यक उपाययोजना व कारवाई महानगरपालिकेकडून केली जात असल्याचे आयुक्त तथा प्रशासक यशवंत डांगे यांनी म्हटले आहे.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles