Friday, March 20, 2026

नगर शहरात झेंडीगेट परिसरात महानगरपालिकेची अतिक्रमणांवर कारवाई

झेंडीगेट परिसरात महानगरपालिकेची अतिक्रमणांवर कारवाई

ओपन स्पेस मधील टपऱ्या पत्राचे शेड कारवाई करून हटवले

नागरिकांनी स्वतःहून अतिक्रमणे काढावीत, अन्यथा जेसीबीच्या सहाय्याने जमीनदोस्त करणार : आयुक्त तथा प्रशासक यशवंत डांगे

अहिल्यानगर – झेंडीगेट परिसरात असलेल्या दक्षिणमुखी हनुमान मंदिर समोरील, तसेच गैबी पीर ओपन पेसमध्ये असलेल्या अतिक्रमणांवर महानगरपालिकेकडून कारवाई करण्यात आली. अनधिकृत पत्रा शेड, तसेच १० ते ११ टपऱ्या व भंगारचे पत्रा शेड महानगरपालिकेने कारवाई करून हटवले. गेल्या काही महिन्यांपासून शहरात अतिक्रमण हटाव मोहीम सुरू आहे. यात आता महानगरपालिकेच्या ओपन स्पेसवरील अतिक्रमणांवर कारवाई सुरू करण्यात आल्याची माहिती आयुक्त तथा प्रशासक यशवंत डांगे यांनी दिली.

महानगरपालिकेच्या झेंडीगेट प्रभाग समिती कार्यालयाच्या क्षेत्रात ही कारवाई सुरू करण्यात आली. अतिक्रमण निर्मूलन विभागाचे उपअभियंता सुरेश इथापे, प्रभाग अधिकारी, क्षेत्रीय अधिकारी रिजवान शेख, अर्जुन जाधव यांच्या पथकाने कोतवाली पोलिसांच्या बंदोबस्तात जेसीबीच्या सहाय्याने अतिक्रमणांवर कारवाई केली. हनुमान मंदिरासमोर व गैबी पीर ओपन स्पेसवर पत्र्याचे शेड व टपऱ्या टाकून अतिक्रमणे करण्यात आली होती. महानगरपालिकेने ही अतिक्रमणे जमीनदोस्त केली.

शहरात अतिक्रमण हटाव मोहीम सुरूच राहणार आहे. रस्त्यावरील अतिक्रमणांसह आता महानगरपालिकेच्या जागा व ओपन स्पेसवर असणाऱ्या अतिक्रमणांवरही कारवाई करण्यात येणार आहे. ज्या नागरिकांनी रस्त्यावर किंवा महानगरपालिकेच्या जागेत अतिक्रमणे केली असतील, ती तत्काळ स्वतःहून काढून घ्यावीत, अन्यथा महानगरपालिका कारवाई करून अतिक्रमणे जमीनदोस्त करेल. कारवाईत संबंधित अतिक्रमण धारकाचे नुकसान झाल्यास त्याला महानगरपालिका जबाबदार असणार नाही, असेही आयुक्त तथा प्रशासक यशवंत डांगे यांनी म्हटले आहे.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles