Friday, February 20, 2026

नगरपंचायत नगरपरिषद निवडणुक ईव्हीएम मशीनमध्ये घोळ; निवडणूक निकालानंतर ७ कर्मचाऱ्यांचं निलंबन

राज्यभरात रविवारी नगरपंचायत आणि नगरपरिषदांच्या निवडणुकीची निकाल जाहीर झाले. या निवडणुकीच्या मतदानाची मोजणी कालच पार पडली. निवडणुकीची मतमोजणी करताना केंद्रावर घोळ झाल्याचा आरोप शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसने केला होता. त्यानंतर आज सोमवारी भंडारा जिल्हाधिकाऱ्यांनी ७ कर्मचाऱ्यांवर निलंबनाची कारवाईची केली आहे.

नगरपालिका निवडणुकीच्या मतमोजणी केंद्रावरील एका ईव्हीएम मशीनमध्ये मोठा घोळ झाल्याचा आरोप रविवारी शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसने केला. भंडाऱ्यातील प्रभाग क्रमांक 3 मधील शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला उमेदवार करुणा राऊत यांचं एका ईव्हीएम मशीनमध्ये नाव नसल्याची तक्रार पक्षाच्या उमेदवाराने काल निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडे केली होती.

तक्रारीनंतर जिल्हाधिकाऱ्यांना चूक लक्षात आली. त्यांनी या प्रकरणात अक्षम्य चूक झाल्याचं मान्य केले. त्यानंतर भंडारा जिल्हाधिकारी सावंत कुमार यांनी मतमोजणी केंद्रावरील सात कर्मचाऱ्यांचं तडकाफडकी निलंबन केलं आहे. या कारवाईन भंडाऱ्यात मोठी खळबळ उडाली आहे.
कर्मचाऱ्यांची नावे


1) मोहम्मद इसरार, उपविभागीय अधिकारी टेकेपार, उपसा सिंचन उपविभाग क्र. १ आंबाडी

2) ए.एन. मळघने, तलाठी चांदोरी.

3) पियुष शक्करवार, लिपिक टंकलेखक, नगर परिषद भंडारा

4) के.एच. लांजेवार, शिक्षक जे. एम. पटेल. कला वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालय भंडारा (केंद्राध्यक्ष)

5) जी. एस. नागदेवे, शिक्षक विकास माध्यामिक शाळा आणि जुनिअर कॉलेज खरबी नाका (मतदान अधिकारी क्र. १)

6) महेश हेमराज दुर्गाडे, सी.ई.ए. प्रधानमंत्री ग्रामसडक योजना एम. आर. आर.डी.ए. भंडारा (मतदान अधिकारी क्र. २)

7) लीनादेवी चीचमलकर, शिक्षक नूतन कन्या शाळा आणि जे. आर. कॉलेज भंडारा (मतदान अधिकारी क्र.३)

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles