Saturday, February 21, 2026

महापालिका निवडणुक एमआयएमचे असदुद्दीन ओवैसी यांची अहिल्यानगरमध्ये प्रचारसभा

अहिल्यानगरला पाहिली प्रचार सभा ओवेसींची…
महापालिका निवडणुकीचे रिंगण आता स्पष्ट झाले असून प्रचाराला सुरवात झाली आहे. अहिल्यानगरमध्ये स्थानिक पातळीवर उमेदवारांनी प्रचाराचे नारळ फोडले आहेत. मात्र बाहेरच्या नेत्याने अहिल्यानगरमध्ये येऊन सभा घेण्याची सुरवात एमआयएम पक्षाकडून होत आहे. एमआयएमचे राष्ट्रीय अध्यक्ष असदुद्दीन ओवैसी यांची उद्या (सोमवारी) अहिल्यानगरमध्ये प्रचारसभा आणि प्रचार फेरी होणार आहे. त्यांच्या सोबत पक्षाचे प्रदेशाध्यक्ष सय्यद इम्तियाज जलील यांच्यासह अन्य पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत, अशी माहिती पक्षाचे जिल्हाध्यक्ष डॉ. परवेज अशरफी यांनी दिली.
मुकुंदनगर आणि झेंडीगेट भागात सभा होतील. या पक्षाने शहरात ६ उमेदवार उभे केले आहेत. राज्यातील नगरपालिका निवडणुकीत बऱ्यापैकी यश मिळाल्यानंतर त्यांनी आता महापालिका निवडणुकीत लक्ष घातले आहे. अहिल्यानगर शहारात काही महिन्यापूर्वीच ओवेसी यांची मुकुंदनगरला सभा झाली होती. त्यावेळी नगरचे आमदार संग्राम जगताप यांना लक्ष्य करून आक्रमक भाषणे झाली होती. “महापालिका निवडणुकीसाठी मी पुन्हा येईल.” असे ओवेसी म्हणाले होते. त्यानुसार ते येत आहेत. मुकुंदनगर भागात भाजप, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेचे उमेदवार नाहीत. तेथे एमआयएम, समाजवादी पक्ष आणि काँग्रेस यांच्यात लढत आहे.
एमआयएमने अहिल्यानगरसह राज्यातील अनेक महापालिकामध्ये लक्ष घातले आहे. स्थानिक नेता नेत्यांसह बिहार, उत्तर प्रदेश वगैरे राज्यातील नेतेही राज्यात आणि अहिल्यानगरलाही प्रचारासाठी येणार आहेत.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles