यशस्वी सापळा कार्यवाही
युनिट – नांदेड.
1) तक्रारदार – वय 27 वर्ष
2) आरोपी इतर लोकसेवक – विजय शेषराव दवणे, उपअभियंता (कंत्राटी), नेम. गुंठेवारी विभाग,नांदेड वाघाळा शहर महानगरपालीका, रा. वसरणी, नांदेड.
3) तक्रारीचे स्वरूप – यातील तक्रारदार हे परवानाधारक स्थापत्य अभियंता असून त्यांनी त्यांचेमार्फत दोन मालमत्ता धारकांची संचिका गुंठेवारी विभाग, महानगरपालीका, नांदेड येथे गुंठेवारी मंजुरीकरिता दाखल केली होती. त्या अनुषंगाने त्यांनी उपअभियंता विजय दवणे यांची भेट घेतली. तेव्हा उपअभियंता विजय दवणे यांनी त्या दोन्ही फाईलवर मान्यतेसाठी शिफारस करण्यासाठी प्रथम 60,000/- रूपयाची मागणी करून तडजोडीअंती 30,000/- रूपये घेण्याचे ठरले. तरी उपअभियंता विजय दवणे हे मागत असलेले 30,000/- रूपये ही लाच असून ती देण्याची तक्रारदार यांना मुळीच इच्छा नसल्याने तक्रारदार यांनी दिनांक 15/09/2025 रोजी लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, नांदेड येथे लाचेची मागणी होत असले बाबत लेखी तक्रार दिली होती.
4)तक्रारीची पडताळणी – दिनांक 15/09/2025 रोजी सदर तक्रारीच्या अनुषंगाने ईलोसे यांचे म.न.पा. नांदेड येथील त्यांचे कार्यालयात शासकीय पंचासमक्ष लाचेची पडताळणी केली. त्यावेळी यातील इतर लोकसेवक यांनी तक्रारदार यांना त्यांचेवतीने गुंठेवारी मंजूरीसाठी दाखल केलेल्या दोन मालमत्ताधारकांचे संचिकेवर मान्यतेसाठी शिफारस करण्यासाठी 30,000/- रूपयाची मागणी करून तडजोडीअंती 28,000/- रूपये लाच स्विकारण्याची सहमती दर्शविली.
5) सापळा कारवाई – दिनांक 15/09/2025 रोजी नांदेड वाघाळा शहर महानगरपालीकेच्या गुंठेवारी विभागात सापळा कारवाईचे आयोजन केले. त्यावेळी यातील लोकसेवक यांनी तक्रारदार यांना त्यांचे वतीने गुंठेवारी मंजुरीकरिता दाखल केलेल्या दोन संचिकेवर मान्यतेची शिफारस करण्यासाठी लाचेची रक्कम 28000/- रूपये पंचासमक्ष स्वतः स्विकारली आहे.
6) आरोपीचे अंग झडतीत मिळून आलेल्या वस्तू –
आरोपी लोकसेवक यांचेकडे रोख – 7020/- रूपये व एक मोबाईल रियलमी 9 ए कंपनीचा असा गुन्हयाचे तपासकामी ताब्यात घेण्यात आला आहे.
7) आरोपीताची घरझडती – यातील आरोपी यांचे वसरणी, नांदेड येथील राहते घराची घरझडती घेण्याची प्रक्रिया सुरू आहे.
8) इतर माहिती – आरोपी इतर लोकसेवक विजय शेषराव दवणे, उपअभियंता, नेम. गुंठेवारी विभाग, नांदेड वाघाळा शहर महानगरपालीका, रा. वसरणी, नांदेड यांचेविरूध्द पो.स्टे. वजीराबाद, जि. नांदेड येथे भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियम 1988 कलम 7 प्रमाणे गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया चालु आहे.
9) आरोपी अटक – लोकसेवक यांना ताब्यात घेण्यात आले असून गुन्हा दाखल झाल्यानंतर अटक करण्याची तजवीज ठेवली आहे.


