Friday, February 20, 2026

‘मेहबूब मेरे, मेहबूब मेरे’ गाण्यावर माय-लेकीचा नादखुळा डान्स; व्हायरल व्हिडीओ

डान्स ही कला क्वचित काही लोकांमध्ये असते. गणपती डान्स एकीकडे आणि दुसरीकडे डान्स शिकणे , त्याची कसून तालीम करणे आणि या सरावाने स्वत:ला घडवणे. पण, हे सर्व करण्यासाठी ज्यांच्याकडे वेळ नसतो किंवा ज्यांची परिस्थिती नसते; अशा लोकांचे काय? तर अशा लोकांसाठी सोशल मीडिया एक साधन उपलब्ध आहे. तर आपल्या पैकी अनेक जण यांचे नकळत व्हिडीओ शूट करतात आणि सोशल मीडियावर शेअर करतात तर अगदी स्वतःचे कौशल्य इतरांपर्यंत पोहचवण्यासाठी हीच मंडळी रील बनवताना दिसतात.

तर आज असाच एक व्हिडीओ व्हायरल होतो आहे; यामध्ये आई आणि लेकीने कमाल केली आहे. बॅग्राऊंडमध्ये बॉलिवूडच्या ‘फिजा’ सिनेमातील सुपरहिट गाण्यांपैकी एक “मेहबूब मेरे, मेहबूब मेरे, तेरी आँखों से मुझे पीने दे कुछ दर्द है मेरे सीने में मुझे मस्त माहौल में जीने दे” या गाण्यावर जबरदस्त डान्स करताना दिसत आहेत. आईने व्हिडीओ शूट करण्यासाठी समोर मोबाईल ठेवला आहे. त्यामध्ये तुम्ही बघू शकता की, दोघी राहतात ते घर पत्र्याचे आहे. आई जेवण करत असताना थोडा वेळ काढून तिची आवड पूर्ण करताना दिसते आहे.

तुम्ही पाहू शकता की, गाण्यादरम्यान आई आणि लेकीने दिलेले ठुमके, त्यांचे एक्स्प्रेशन, त्यांच्या परफेक्ट स्टेप्स आदी सगळ्याच गोष्टी अगदी बघण्यासारख्या आहेत. गाण्याच्या प्रत्येक ओळीवर दोघींचे हावभाव, त्यांचा ताळमेळ तर अगदी बघण्यासारखा आहे. परिस्थिती न बघता तुम्ही त्यांच्या कौशल्याकडे बघाल तर जोरजोरात टाळ्या वाजवाल एवढे तर नक्की. “मेहबूब मेरे, मेहबूब मेरे” गाण्यावर आई आणि लेकीचा भन्नाट डान्स एकदा व्हायरल व्हिडीओतून तुम्हीसुद्धा बघा…

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles