Thursday, October 30, 2025

‘नगर अर्बन’च्या ठेवीदारांची उद्या नगरला बैठक; ठेवी व कायदेशीर कारवाईवर होणार चर्चा

अहिल्यानगर-नगर अर्बन बँकेत पाच लाखापुढे ठेवी असलेल्या ठेवीदारांचे पैसे परत मिळण्यास होत असलेला विलंब तसेच नगर अर्बन बँक डबघाईस आणणारे संचालक मंडळ व थकबाकीदार कर्जदार यांच्यावर कायदेशीर कारवाईला असलेली संथ गतीच्या विषयावर चर्चा करण्यासाठी उद्या (रविवार, 20 एप्रिल) सकाळी साडे दहा वाजता अहिल्यानगर शहरातील महाजनगल्लीतील गायत्री मंदिर सभागृहात नगर अर्बन बँकेच्या ठेवीदारांची बैठक होणार आहे.

नगर अर्बन बँक बचाव कृती समितीचे सचिव डी. एम. कुलकर्णी यांच्या पुढाकाराने या बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे. नगर अर्बन बँकेत पाच लाखापेक्षा जास्त रकमेच्या ठेवी असलेल्या ठेवीदारांना त्यांचे पैसे परत कधी मिळणार, यांची आशा लागली आहे. तसेच बँकेला अडचणीत आणणार्‍या संशयित आरोपींना कठोर शासन होण्याच्यादृष्टीने प्रशासनाकडूनही गांभीर्याने हालचाली होत नसल्याचे ठेवीदारांचे म्हणणे आहे. त्यामुळे या विषयावर चर्चा करण्यासाठी व पुढील आंदोलनाची दिशा ठरवण्यासाठी ठेवीदार व खातेदारांसह सभासदांची बैठक रविवारी सकाळी होणार असल्याचे कुलकर्णी यांनी सांगितले.

दरम्यान, यानंतर ठेवीदारांची कोणतीही बैठक घेतली जाणार नाही व व्हॉटसअ‍ॅपवर ठेवीदारांकडून दिल्या जाणार्‍या सूचनांचीही दखल घेतली जाणार नाही. त्यामुळे रविवारच्या बैठकीस ठेवीदारांनी आवर्जून उपस्थित राहावे, असे आवाहनही त्यांनी केले आहे.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles