नागपुरातून एक खळबळजनक बातमी समोर आली आहे. यात भारतीय जनता पक्षाच्या नवनिर्वाचित नगरसेविका मानसी शिमले यांचे पती नितीन शिमले यांच्यावर सशस्त्र हल्ला करण्यात आलाय. या हल्ल्यात नितीन शिमले गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहे. ही घटना रविवारी रात्रीच्या सुमारास जुनी शुक्रवारी परिसरात घडलीय. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळ गाठत अधिक तपास सुरु केलाय. मात्र या घटनेनं राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे.कोतवाली पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, नितीन शिमले आणि आरोपी सोनू ठाकरे उर्फ पैलवान यांच्यात पैशाच्या व्यवहारावरून वाद होते. यावरून सोनू पैलवानने रविवारी रात्री जुनी शुक्रवारी चौकात नितीन शिमले याच्यावर चाकुने हल्ला केला. या हल्ल्यात शिमले गंभीर जखमी झाले. घटनेची माहिती मिळताच कोतवाली पोलिस लगेच घटनास्थळावर पोहोचले. त्यांनी जखमी नितीन यांना रुग्णालयात दाखल केले. तर मारेकरी सोनू ठाकरे हा घटनास्थळावरून फरार झाला असून सध्या पोलीस सोनू पैलवानचा शोध घेत आहे.दरम्यान, जुन्या वादातून मित्र महेश ठाकरेने भाजपाच्या नगरसेविका मानसी शिमले यांच्या पती नितीन शिमले यांच्यावर प्राणघातक हल्ला केलाय. धारधार शस्त्राने हा हल्ला केल्याने शिमले गंभीर जखमी झाले आहे. कोतवाली पोलीस ठाण्याच्या हद्दीतील जुनी शुक्रवारी परिसरातील हि घटना घडलीय. जुन्या हत्येच्या प्रकरणात नितीन शिमले व महेश ठाकरे आरोपी होते. सध्या नितीन शिमले यांच्यावर खाजगी रुग्णालयात उपचार सुरु असून पोलिसांचा तपास सुरु आहे.
धक्कादायक! भाजप नगरसेविकेच्या पतीवर सशस्त्र हल्ला; भाजप कार्यकर्ता गंभीर जखमी
- Advertisement -


