शालार्थ आयडी घोटाळा….दोन शिक्षणाधिकाऱ्यांना एसआयटीकडून अटक

राज्यात गाजत असलेल्या शालार्थ आयडी घोटाळ्यात दोन शिक्षणाधिकाऱ्यांना अटक करण्यात आली आहे. या प्रकरणी तपासासाठी गठीत ‘एसआयटी’ने विद्यमान प्राथमिक शिक्षणाधिकारी सिद्धेश्वर काळुसे व माध्यमिक शिक्षणाधिकारी रोहिणी कुंभार यांना अटक केली आहे. पोलिसांनी या दोघांच्याही चौकशीसाठी पोलीस कोठडीची मागणी केली होती. मात्र त्यांची न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली आहे. त्यांच्या चौकशीतून अनेक नव्या आणि धक्कादायक बाबी समोर येण्याची शक्यता असल्याने पोलीस सत्र न्यायालयात ‘रिव्हिजन’ अर्ज दाखल करणार असल्याची ही माहिती आहे.

सदर प्रकरणात आतापर्यंत अटक झालेले आरोपी व दस्तावेजांच्या तपासानंतर पोलिसांना या प्रकरणात सिद्धेश्वर काळुसे व रोहिणी कुंभार यांचादेखील समावेश असल्याचे स्पष्ट झाले. सिद्धेश्वर काळुसे हे १६ मार्च २०२४ पासून आजपर्यंत शिक्षणाधिकारी म्हणून कार्यरत आहेत. तर रोहिणी कुंभार या २१ मार्च २०२२ ते १५ मार्च २०२४ या कालावधीत शिक्षणाधिकारी होत्या. त्या कालावधीत मोठ्या प्रमाणात बोगस शालार्थ आयडी जारी झाल्याचे चौकशीत समोर आले. त्यानंतर पोलिसांनी दोघांनाही बुधवारी अटक केली.

शालार्थ आयडी घोटाळा प्रकरणात आता पोलिसांचीच राज्यपातळीवर एसआयटी गठित करण्यात आली आहे. बोगस शिक्षक भरती प्रकरणी सर्व तक्रारीची या एसआयटी अंतर्गत एकत्रित चौकशी करण्यात येणार आहे. नागपुरातील झोन 2 चे पोलिस उपायुक्त नित्यानंद झा हे सध्या नागपुरात स्थापन करण्यात आलेल्या विशेष तपास पथकाचे नेतृत्व करत आहेत.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles