Friday, February 20, 2026

केंद्रीय मंत्री नितीन गडकरींनी छोट्या आणि खासगी विमानाने प्रवास करू नये

उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या विमान अपघाताबद्दल फक्त आम्हालाच नव्हे तर त्यांच्या पक्षाच्या नेत्यांना, आमदारांनाही शंका आहे. त्यामुळे या प्रकरणाची चौकशी उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशाच्या नेतृत्वाखाली झाली पाहिजे अशी मागणी शरद पवार गटाचे नेते माजी मंत्री अनिल देशमुख यांनी केली. केंद्रीय मंत्री नितीन गडकरींनीही छोट्या आणि खासगी विमानाने प्रवास करू नये असं मी त्यांना सांगणार असल्याचंही देशमुख म्हणाले.

देशमुख म्हणाले की, “बारामतीच्या एअरपोर्टवर धुकं असल्याने हा अपघात झाल्याचं आधी सांगण्यात आलं. पण ते विमान हवेत असतानाच तिरके झाले आणि हा अपघात झाला, त्याचा एक व्हिडीओ समोर आला आहे. हा व्हिडीओ खूप लांबून काढण्यात आल्याचं दिसतंय. त्यामुळे जर धुकं असतं तर हा व्हिडीओ काढता येणं शक्य होतं का?”

अजित पवारांचा झालेला अपघात हा संशयास्पद असल्याचं मत अनिल देशमुखांनी व्यक्त केलं. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी हे जर मला कधी विमानतळावर भेटले तर तुम्ही छोट्या आणि खासगी विमानाने प्रवास करू नका असं मी त्यांना सांगणार असल्याचं अनिल देशमुखांनी म्हटलं.

देशमुख म्हणाले की, “दुखवटा संपल्यानंतर आम्ही याबाबतची सविस्तर माहिती जाहीर करू. दोन्ही राष्ट्रवादीच्या विलिनीकरणाच्या 14 बैठका झाल्या. त्यापैकी काही बैठकींना मी देखील होतो. या बैठकींना कोण-कोण उपस्थित होतं, त्यामध्ये काय ठरलं यासह अनेक सविस्तर गोष्टी आम्ही जाहीर करू.”

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles