Monday, February 23, 2026

अहिल्यानगरमध्ये नायब तहसीलदाराची रेल्वेगाडी खाली उडी घेत आत्महत्या

अहिल्यानगर – अहिल्यानगरच्या जिल्हाधिकारी कार्यालयात मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधी कक्षात कार्यरत असलेले नायब तहसीलदार किरण रामदास देवतरसे (वय ५७, रा.भिंगार) यांनी रेल्वे गाडीखाली उडी घेऊन आत्महत्या केल्याची घटना ३१ जानेवारीला सकाळी ८.३० च्या सुारास घडली.

सदरची घटना एम आयडीसी ते निंबळक जाणार्‍या रोडवर असलेल्या रेल्वे गेट जवळ घडली आहे. सकाळी ८.३० च्या सुमारास अमरावती ते पुणे जाणार्‍या रेल्वे गाडीखाली एकाने उडी घेऊन आत्महत्या केल्याचे काही नागरिकांच्या निदर्शनास आल्यावर त्यांनी एमआयडीसी पोलिसांना माहिती कळविली. ही माहिती मिळताच स.पो.नि. माणिक चौधरी यांच्यासह पथकाने घटनास्थळी धाव घेतली. मयताची ओळख पटविण्याचा प्रयत्न केला असता ते नायब तहसीलदार किरण देवतरसे हे असल्याचे समोर आले.

पोलिसांनी मृतदेह शवविच्छेदनासाठी रुग्णवाहिकेद्वारे जिल्हा शासकीय रुग्णालयात पाठविला. या प्रकरणी एमआयडीसी पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्युची नोंद करण्यात आली आहे. नायब तहसिलदार देवतरसे यांनी आत्महत्या का केली? याचे कारण समजू शकले नाही. या घटनेने महसूल विभागातील अधिकारी कर्मचार्‍यांध्ये हळहळ व्यक्त होत आहे.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles