वारकरी मंडळाचे अध्यक्ष ह.भ.प.भिवसेन महाराज हराळ यांना पितृशोक ; गुंडेगाव येथील नामदेव आनंदा हराळ यांचे निधन
वाळकी प्रतिनिधी :- अहिल्यानगर तालुक्यातील गुंडेगाव येथील प्रतिष्ठित नागरिक व अहिल्या नगर वारकरी संप्रदाय मंडळाचे अध्यक्ष तसेच गुंडेगाव येथील राधाकृष्ण भजनी मंडळ संस्थापक ह.भ.प.शिवसेन नामदेव हराळ महाराज यांचे वडील नामदेव आनंदा हराळ यांचे दि.९ जुलै २०२५ रोजी पहाटे एकच्या सुमारास गुंडेगाव येथील राहत्या घरी दुःखद निधन झाले.मृत्यू समयी त्यांचे वय ९७ वर्षे होते. बुधवारी सकाळी ११ च्या सुमारास त्यांच्या वरती गुंडेगाव हराळमळा येथे अंतिम संस्कार करण्यात आले.यावेळी नातेवाईकांसह अनेक मान्यवर उपस्थित होते. जुन्या पिढीतील एक पान यांच्या रूपातून गळाले आहे.पांडुरंग भक्त असलेले नामदेवराव उर्फ आप्पा अतिशय धार्मिक वृत्तीचे,वारकरी संप्रदायात रमलेले आणि गावातील प्रत्येक कार्यक्रमात मग तो धार्मिक कार्यक्रम असो दिंडीचा कार्यक्रम असो एखाद्या संताचा सप्ताह असो की कोणतेही विधायक कार्य असो त्यात ते अग्रभागी असायचे.अतिशय मवाळ स्वभाव इतरांना मदत करण्याचा स्थायीभाव त्यांचा होता. अगदी सुरुवातीच्या काळात त्यांनी शेती व्यवसाय केला. सुस्वाभावी असलेल्या आप्पाची दुर्दैवाने काल त्यांची प्राणज्योत मालवली व गावातील सर्वांशी जिव्हाळ्याचे आणि आपुलकीचे संबंध असलेले एक व्यक्तिमत्व अनंताच्या प्रवासाला गेले.
अहिल्यानगर वारकरी संप्रदायाचे अध्यक्ष भिवसेन महाराज हराळ तसेच गुंडेगाव सोसायटी मा.चेअरमन धान्य वितरक रावसाहेब हराळ, धार्मिक वृत्तीचे बाबासाहेब हराळ, तुळशीदास हराळ यांचे वडील होते. त्यांच्या पश्चात चार मुले तर विवाहित एक मुलगी असून सुना, नातवंडे,जावई असा मोठा परिवार आहे.


