अशोक खरात प्रकरणात महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांच्या राजीनाम्याची मागणी करण्यात येत आहे. त्यातच मंत्री दत्तात्रय भरणे यांनी चाकणकरांची पाठराखण केली होती. मात्र, राष्ट्रवादीचे कार्याध्यक्ष प्रफुल्ल पटेल यांनी रुपाली चाकणकरांवर कारवाई करण्याचे संकेत दिले आहेत. ते म्हणाले, अशोक खरात याच्यावर कारवाई झालीच पाहिजे. तसेच त्याच्या सोबत सोबत या कामात जे राहिले असेल तर निश्चित त्यांची नावे चौकशीत समोर येतील त्यांच्यावरही तातडीने आणि सक्तीने कारवाई केली गेली पाहिजे.’काही राजकीय नेत्यांचा नाव त्यांच्याशी जोडलं गेलं आहे. नक्की आम्ही राष्ट्रवादी म्हणून योग्य कारवाई करणार आणि तुम्हाला या एक दोन दिवसात ते दिसले.’, असे म्हणत पटेल यांनी चाकणकरांवर कारवाईचे संकेत दिले आहेत.
नाशिकमध्ये बलात्कार प्रकरणात नाशिक पोलिसांनी अशोक खरात या भोंदू ज्योतिषाला अटक केली असून. राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांच्यासोबतचे अशोक खरातचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. या घटनेनंतर राज्यातील विविध नेत्यांनी रुपाली चाकणकर यांच्यावर टीका केली आहे. या प्रकरणी रुपाली चाकणकर यांचा राजीनामा घेण्याची मागणी जोर धरत आहे. यावर राष्ट्रवादीचे नेते प्रफुल पटेल यांनी म्हटले आहे की, भोंदु बाबाचे जे काही प्रकार आहेत ते अतिशय वाईट आहे आणि घाणेरडा आहे. त्याच्यावर सक्त कारवाई केली पाहिजे, आणि जे लोक त्यांच्या सोबत आहेत. त्यांच्यावर सुद्धा सक्तीने कारवाई केली पाहिजे, त्याच प्रमाणे या प्रकरणात काही राजकीय नेत्यांचे नाव जोडले गेले आहेत, त्यावर आम्ही राष्ट्रवादी पक्षाकडून योग्य कार्यवाही करणार आहे आणि ते येणाऱ्या काळात दिसेल.


