नाशिकमध्ये खरात पार्ट 2, ऑफिसबॉयनेच मालकाला अडकवलं, 121 महिलांचे अश्लील व्हिडिओ..

नाशिकमधील भोंदू अशोक खरातचे प्रकरण संपूर्ण देशभर चर्चेत आहे. भोंदू अशोक खरातने शेकडो महिलांचे लैगिंक शोषण केल्याचे समोर आले आहे. तसेच अनेकांची मोठी आर्थिक फसवणूक करत त्याने मोठी माया जमवली आहे. एसआयटीकडून या प्रकरणाचा तपास सुरु असतानाच नाशिकमध्ये अशाच प्रकारे महिलांच्या लैगिंक शोषणासंबंधी आणखी एक धक्कादायक घटना समोर आली आहे. खरात पार्ट 2 अशी चर्चा नाशिकमध्ये या प्रकरणाविषयी सुरु आहे.

शहराच्या सातपूर परिसरात घडलेल्या या प्रकरणाने नाशिक शहर पुन्हा एकदा हादरले आहे. स्वत:ला पत्रकार व लघुउद्योजक कन्सल्टंट म्हणवणाऱ्या ६३ वर्षीय व्यक्तीने आपल्याकडे १२ लाखांची खंडणी मागितली जात असल्याची तक्रार पोलिसांकडे केली होती. त्यानुसार त्याला ब्लॅकमेल करणाऱ्या चौघांना पोलिसांनी बेड्या ठोकल्या. पण, त्यातून तक्रारदाराचेच महिलांच्या अत्याचाराचे शेकडो व्हिडीओ पोलिसांच्या हाती लागले आहेत.

हे अश्लील व्हिडिओ त्याने एका खासगी टॅब आणि हार्डडिस्कमध्ये थेट पीडित महिलांच्या नावे ‘फोल्डर’ करून साठविले. त्याच्या ऑफिसमध्ये काम करणाऱ्या आकाश बकरे या ऑफिसबॉयला आपल्या संपाद‌काच्या नीच कृत्याचा सुगावा लागला. त्याने संधी साधून केबिनमधून तो टॅब आणि हार्डडिस्क (दि. १) चोरली. पन्नासहून अधिक ‘न्यूड व्हिडिओ’ ताब्यात असल्याचे पाहून आकाशने तीन मित्रांच्या मदतीने त्याला धमकावण्यास सुरुवात केली. व्हिडिओ व्हायरल न करण्यासाठी १२ लाख रुपयांच्या खंडणीची मागणी केली. भीतीपोटी त्याने सुरुवातीला १० हजार रुपये दिले.

मात्र, पैशांची मागणी वाढतच गेली. वारंवारच्या ब्लॅकमेलिंगला कंटाळून आणि बदनामीच्या भीतीने, पत्रकाराने २ एप्रिल २०२६ रोजी सातपूर पोलीस ठाण्यात धाव घेतली. त्याने स्वतः चे कृत्य लपवून फक्त ‘टॅब व हार्डडिस्क चोरी’ आणि ‘खंडणी’ची फिर्याद नोंदविली. दरम्यान, पोलिसांनी जप्त केलेली हार्डडिस्क आणि पेनड्राइव्ह आता विश्लेषणासाठी पाठवले आहेत. या अहवालानंतर मूळ फिर्यादी असलेल्या पत्रकारावर लैंगिक अत्याचाराचे गंभीर गुन्हे दाखल होण्याची शक्यता असून, नाशिकमधील हे आतापर्यंतचे मोठे ‘डिजिटल सेक्स स्कँडल’ ठरण्याची चिन्हे आहेत.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles