Thursday, February 19, 2026

राज ठाकरे नरेंद्र मोदींना जास्तच घाबरले आहेत, त्यांनी घाबरलं नाही पाहिजे….

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा अलीकडेच झालेला कार्यक्रम विविध क्षेत्रांतील मान्यवरांच्या उपस्थितीमुळे चर्चेत आला. या कार्यक्रमात सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांनी संघाची भूमिका, कार्यपद्धती आणि समाजातील योगदान याविषयी मार्गदर्शन केले. कार्यक्रमाला चित्रपटसृष्टीतील काही नामांकित कलाकारांनीही हजेरी लावली होती.

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी या कार्यक्रमावर टीका करत उपस्थितीमागील कारणांवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. सरकारच्या दबावामुळे किंवा भीतीपोटी अनेक जण कार्यक्रमाला उपस्थित राहिल्याचा टोला त्यांनी लगावला.

यावरती आता महाराष्ट्राते माजी राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी प्रतिक्रिया देताना राज ठाकरेंना डिवचलं आहे. राज ठाकरेंच्या टीकेवर नाशिकमध्ये माध्यमांनी उपस्थित केलेल्या प्रश्नावर भगतसिंग कोश्यारी म्हणाले, संघाच्या कार्यक्रमात आलेले ते मोदींना घाबरून नाही आले. मी राज ठाकरे यांचा आदर करतो. मला असं वाटतं आहे की, राज ठाकरे नरेंद्र मोदींना जास्तच घाबरले आहेत, त्यांनी घाबरलं नाही पाहिजे, त्यांनी मोंदीजींच्या जवळ गेलं पाहिजे. मोदींजींसाठी सर्व जनता समान आहे, ज्याप्रमाणे रामाला त्यांची सर्व प्रजा समाज होती, त्याप्रमाणे मोदींजींना देखील सगळे समान आहेत, राज ठाकरे माझ्या लहान भावासारखे आहे. ते खूप चांगले, कडक नेते आहे. त्यांना मी सांगू इच्छितो मोदींना घाबरू नका, तुम्ही छत्रपती शिवाजी महाराजांच्या कर्मभूमीमध्ये आहात, त्यामुळे घाबरण्याचं काही कारण नाही, घाबरायचं असेल तर चुकीचे काम करण्यास घाबरा, असंही भगतसिंग कोश्यारी यांनी म्हटलं आहे.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles