Friday, February 20, 2026

नाशिक-पुणे रेल्वे अहिल्यानगर मार्गाने धावणार ; नवा समायोजित मार्गाची रेल्वेमंत्र्यांकडून माहिती

अहिल्यानगर-नगर उत्तर जिल्ह्यात सध्या नाशिक-पुणे या रेल्वे मार्गावरून तीन तालुक्यामध्ये जोरदार संघर्ष चालू असतांना केंद्रीय मध्य रेल्वे सल्लागार समितीचे सदस्य सुदर्शन डूंगरवाल अहिल्यानगर- पुणे या उच्चगती रेल्वे मार्गाला केंद्र सरकारकडून गती मिळाल्याचे सांगून नाशिक-पुणे हा रेल्वे मार्गच अहिल्यानगर मार्ग जाणार असल्याचे स्पष्ट केले आहे. केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी लोकसभेत या प्रकल्पाच्या नव्या समायोजित मार्गाबाबत दिल्याचे डूंगरवाल यांनी दिला.पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी प्रशासकीस्तरावर आवश्यक समन्वय साधत प्रकल्पाला गती देण्यास महत्त्वाची भूमिका बजावली. माजी खासदार सुजय विखे यांनी संबंधित मंत्रालयांशी नियमित संवाद साधत मंजुरी, दुरुस्ती आणि तांत्रिक प्रक्रियांना गती दिली. स्थानिक नेतृत्वाच्या या संयुक्त प्रयत्नांमुळे प्रकल्प प्रभावीपणे पुढे सरकला आहे. पूर्वीचा मार्ग नारायणगावमार्गे ॠचठढ वेधशाळेजवळून जात असल्याने विज्ञान व तंत्रज्ञान विभाग तसेच अणुऊर्जा विभागाने आक्षेप घेतला होता. ॠचठढच्या संवेदनशील उपकरणांवर परिणाम होऊ शकतो, असे कारण देत हा मार्ग नाकारण्यात आला.

नवा सुधारित मार्ग – नाशिक – साईनगर शिर्डी – पुणतांबा – निंबळक – अहिल्यानगर – पुणे (चाकण औद्योगिक वसाहत मार्गे) असा असणार आहे. हा मार्ग संवेदनशील परिसर टाळत अधिक व्यापक क्षेत्रांना जोडणार आहे.नाशिक रोड-साईनगर शिर्डी दुहेरीकरणाचा आराखडा तयार झाला आहे. शिर्डी-पुण्तांबा (17 किमी) साठी 240 कोटी मंजूर, पुणतांबा-निंबळक (80 किमी) दुहेरीकरण पूर्ण, निंबळक-अहिल्यानगर (6 किमी) काम प्रगत, अहिल्यानगर-पुणे (133 किमी) दुहेरी मार्गाचा 8 हजार 970 कोटींचा आराखडा तयार केला आहे.

या प्रकल्पामुळे धार्मिक पर्यटन, औद्योगिक वाढ आणि शैक्षणिक-शहरी विकासाला मोठा वेग मिळणार आहे. शिर्डी, त्र्यंबकेश्वर, पंढरपूर मार्गावरील भाविकांना सुलभ प्रवास उपलब्ध होणार असून चाकण एमआयडीसी, ऑटोमोबाईल आणि इंजिनिअरिंग उद्योगांना मोठा लाभ होणार आहे. नाशिक-पुणे विद्यार्थी व कामगार गतिशीलतेतही लक्षणीय वाढ अपेक्षित आहे. प्रधानमंत्री गतीशक्ती अंतर्गत या पट्ट्यात मल्टिमोडल कार्गो टर्मिनल उभारण्याचीही क्षमता असल्याचे नमूद करण्यात आले असून यासाठी संयुक्त समिती स्थापन करण्याची गरज असल्याचे डूंगरवाल यांनी स्पष्ट केले आहे.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles