पहलगाममध्ये २२ एप्रिल रोजी पर्यटकांवर हल्ला करण्यात आला. पाकिस्तानकडून करण्यात आलेल्या या भ्याड हल्ल्यानंतर भारतीयांकडून संताप व्यक्त होत असून सरकारने या हल्ल्याचा बदला घेण्याची भावना व्यक्त होत असून भारत-पाकमधील तणाव वाढला आहे. अशात युद्धाची शक्यता व्यक्त केली जात आहे. केंद्रीय गृह मंत्रालयाने अनेक राज्यांना ७ मे रोजी बुधवारी, मॉक ड्रिक करण्याचं सांगितलं आहे. गृह मंत्रालयाने सर्व राज्यांना मॉक ड्रिल करण्याचे आदेश दिले.
या मॉक ड्रिलमध्ये लोकांना जागरुक केलं जाईल, की हवाई हल्ल्याच्या वेळी काय करायचं. ब्लॅकआउट किंवा इतर परिस्थितीत कोणती पावलं उचलावीत आणि स्वतःचं संरक्षण कसं करावं याबद्दल लोकांना मॉक ड्रिलद्वारे माहिती दिली जाईल. नागरिकांची सुरक्षितता सुनिश्चित करण्याच्या उद्देशाने लोकांमध्ये जागरूकता निर्माण करण्यासाठी हे मॉक ड्रिल ७ मे रोजी घेण्यात यावं असे आदेश देण्यात आले आहेत.
भारताने ७ मे रोजी नागरी सुरक्षेसाठी हवाई हल्ला, ब्लॅकआउट, नागरिक प्रशिक्षणासह रंगीत तालीम करण्याचा निर्णय घेतला आहे. त्याची भीती पाकिस्तानने घेतली आहे. देशात ५४ वर्षानंतर मॉक ड्रिल होत आहे. यापूर्वी १९७१ मध्ये मॉक ड्रिल झाले होते. १९७१ मध्ये भारत- पाकिस्तान दरम्यान दोन आघाडींवर युद्ध झाले होते. त्या युद्धाच्या ५४ वर्षानंतर आता मॉक ड्रिल होत आहे.पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि रशियाचे अध्यक्ष व्लादिमिर पुतीन यांच्यात दहशतवादविरोधी चर्चा झाली. या चर्चेत रशियाने भारताला ठाम पाठिंबा दिला.


