पाथर्डी नगराध्यक्ष पदाच्या निवडणुकीत राष्ट्रवादीच्या उमेदवाराची अचानक माघार; भाजपच्या खेळीमुळे अजित पवार गटाला धक्का
पाथर्डी नगर परिषदेच्या निवडणुकीसाठी येत्या 20 डिसेंबरला मतदान होणार आहे, या निवडणुकीत राष्ट्रवादी अजित पवार गट, राष्ट्रवादी शरद पवार गट आणि भाजप असा तिरंगी सामना रंगला होता. मात्र आता राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या उमेदवारानं निवडणुकीतून माघार घेतल्यामुळे इथे दुरंगी लढत होणार आहे, राष्ट्रवादी शरद पवार गट आणि भाजपमध्ये सामना रंगणार आहे.राष्ट्रवादी अजित पवार गटाचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार संजय भागवत यांनी नगरपरिषद निवडणुकीतून माघार घेतली आहे. येत्या वीस डिसेंबरला या नगर परिषदेसाठी मतदान होणार होतं, मात्र त्यापूर्वीच राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या उमेदवारानं निवडणुकीतून माघार घेतली आहे. या नगर परिषदेसाठी राष्ट्रवादी अजित पवार गट, भाजप आणि राष्ट्रवादी शरद पवार गट अशी तिरंगी लढत होणार होती. मात्र आता अजित पवार गटाच्या उमेदवारानं माघारी घेतल्यामुळे इथे दुरंगी लढत होणार आहे
पक्षश्रेष्ठी व पक्षाच्या पदाधिकाऱ्यांना विश्वासात न घेताच भागवत यांनी आपला उमेदवारी अर्ज मागे घेतल्याचे सांगितले जाते
भागवत यांना पर्यायी उमेदवार म्हणून अजित पवार गटाने एबी फॉर्मवर नाव टाकलेले राहुल ढाकणे यांचा उमेदवारी अर्ज यापूर्वीच झालेल्या छाननीत निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी अवैध ठरवला ढाकणे यांच्या उमेदवारी अर्जाला ५ सूचक नसल्याचे कारण देत निवडणूक निर्णय अधिकारी प्रसाद मते व डॉ. उद्धव नाईक यांनी दिले होते. नगराध्यक्ष पदासाठी निवडणूक रिंगणात उमेदवारचं नसल्याने अजित पवार गटाची मोठीच गोची झाली आहे. ढाकणे यांचा अर्ज बाद केल्याच्या मुद्यावरून आता अजित पवार गटाने न्यायालयात जाण्याची तयारी केल्याने ही निवडणूक पुन्हा लांबणीवर पडण्याची शक्यता ही वर्तवली जात आहे


