या दुतोंडीपणाला काय म्हणावे ? सुनिल तटकरे यांच्या बदलत्या भूमिकेवर टिका

राष्ट्रवादी काँग्रेसच्या विलिनीकरणासंदर्भातील माहिती होतं, माझा त्याला विरोध नव्हता असं सुनील तटकरे म्हणाले. मात्र, आधी माध्यामांसमोर बोलताना सुनील तटकरेंनी याबाबतच्या गोष्टी नाकारल्या होत्या, त्यामुळे आता चर्चांना उधाण आलं आहे.

सुनील तटकरेंच्या या दोन्ही भुमिकेवरून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते विकास लवांडे यांनी त्यांच्यावरती हल्लाबोल केला आहे. विकास लवांडे यांनी सुनील तटकरेंची विलीनीकरणाच्या चर्चा नाकारल्याचा आणि त्याची माहिती असल्याचा व्हिडीओ शेअर करत तटकरेंवर टीका केली आहे. विकास लवांडे यांनी दोन्ही व्हिडीओ शेअर करत म्हटलंय की, “या दुतोंडीपणाला काय म्हणावे ? 16 फेब्रुवारी 2026 आणि 31 मार्च 2026 दोन्ही वेगवेगळ्या मुलाखतीत वेगवेगळ्या स्टोऱ्या का तयार केल्या ? @SunilTatkareसाहेब तुम्हीच सांगा याला काय म्हणतात ? म्हणजे तुम्ही खोटं किंवा सोईचे बोलता हे सिद्ध झाले आहे. तुम्ही अजितदादांना त्यांच्या निधनानंतर सुद्धा अविश्वास दाखवत खोटं ठरवले याचे वाईट वाटले आणि चीड येते. वर स्वतःला दादांचे मित्र म्हणवता ? कपटी मित्रा पेक्षा दिलदार शत्रू बरा!”.https://x.com/VikasLawande1/status/2039237636897026223?s=20

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles