उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनानंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अत्यंत मोठा निर्णय घेतला. अजित पवार यांच्या निधनामुळे राष्ट्रवादी काँग्रेसने जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीचा प्रचार थांबवला आहे. ना प्रचार सभा ना रोड शो केले जातील. फक्त मतदारांना पत्रके वाटून प्रचार करण्याचा निर्णय घेण्यात आला.
उमेदवारांच्या कुठल्याही प्रचार सभा आणि रोड शो घेतले जाणार नाहीत, उमेदवारांनी घरोघरो जाऊन पत्रके वाटून निवडणूक लढवावी असे स्पष्ट आदेश देण्यात आली. हेच नाही तर निवडणूक जिंकल्यानंतरही कोणत्याही प्रकारची मिरवणूक काढली जाणार नाही. अजित पवार यांच्या निधनानंतर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीला मोठा धक्का बसला आहे.
अजित पवार यांच्या जाण्याने फक्त पवार कुटुंबियांवरच नाही तर राज्यावर दु:ख कोसळले. काल बारामतीसह राज्यात शोककळा होती. बारामतीच्या विद्या प्रतिष्ठानच्या प्रांगणात अजित पवार यांच्या पार्थिवावर काल अंत्यसंस्कार झाली.
राज्यातील १२ जिल्हा परिषदांच्या निवडणुका सध्या सुरू आहे. काल निवडणूक आयोगाने मतदान आणि मतमोजणीच्या नवीन तारखाही जाहीर केल्या आहेत.


