ऐतिहासिक माळीवाडा वेश वाचवण्यासाठी राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीने आज तीव्र निदर्शन आम्ही केली.
वेशीवर बुलडोझर चालवला तर प्रत्येक कार्यकर्ता बुलडोझर खाली येणार- अभिषेक कळमकर.
अहिल्यानगर (प्रतिनिधी)- माळीवाडा येथील पाचशे वर्षांहून अधिक प्राचीन असलेल्या ऐतिहासिक माळीवाडा वेश पाडण्याचा निर्णय अहिल्यानगर महानगरपालिकेने घेतल्याच्या निषेधार्थ राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाच्या वतीने वेशीसमोर तीव्र निदर्शने करण्यात आले. या आंदोलनाचे नेतृत्व राष्ट्रवादीचे शहर-जिल्हाध्यक्ष तथा माजी महापौर अभिषेक कळमकर यांनी केले. यावेळी बोलताना अभिषेक कळमकर यांनी स्पष्ट शब्दांत इशारा दिला की, ज्यावेळी माळीवाडा वेशीवर बुलडोझर चालेल, त्यावेळी राष्ट्रवादीचा प्रत्येक कार्यकर्ता बुलडोझरखाली झोपण्यास तयार असेल. शहराच्या सांस्कृतिक व ऐतिहासिक वारशाचा अविभाज्य भाग असलेल्या या वेशीला कोणत्याही परिस्थितीत हात लावू देणार नाही, अशी ठाम भूमिका त्यांनी मांडली.
माळीवाडा वेस ही केवळ एक वास्तू नसून अहिल्यानगरच्या इतिहासाची, परंपरेची व ओळखीची साक्ष असल्याचे सांगत, विकासाच्या नावाखाली ऐतिहासिक वारसा नष्ट करणे अयोग्य असल्याचे मत कळमकर यांनी व्यक्त केले. या निर्णयाविरोधात सर्व नगरकरांनी एकत्र येऊन आवाज उठवण्याचे आवाहनही त्यांनी केले.
या आंदोलनात संजय झिंजे,निलेश मालपाणी, नितीन भुतारे, नलिनीताई गायकवाड, रोहन शेलार, प्रा. अमोल खाडे, दीपक सुडके, देविदास सुडके, बाळासाहेब डाडर, अल्तमश जरीवाला,दिनकर सकट,चंद्रकांत उझागरे,राजेश शिंदे, राम वाणी, रामदास झिने,गौरव भोसले,नूरखा पठाण, प्रमोद आढाव, अभिषेक जगताप, राहुल घोरपडे, ऋषिकेश रासकर,गौरव शेटे, ऋषिकेश शेटे, गौरव भोसले, चैतन्य ससे यांच्यासह मोठ्या संख्येने राष्ट्रवादीचे पदाधिकारी व नगरकर उपस्थित होते.
महानगरपालिकेच्या या निर्णयाचा जाहीर निषेध नोंदवून, माळीवाडा वेश जतन व संवर्धन करण्याची मागणी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीने करण्यात आली.



