Wednesday, October 29, 2025

नव्याने बीड-अहिल्यानगर रेल्वे धावली ,अहिल्यानगर रेल्वे स्थानकावर स्वागत

नव्याने बीड-अहिल्यानगर रेल्वे धावली
अहिल्यानगर रेल्वे स्थानकावर स्वागत
बीड व अहिल्यानगरकरांची होणार सोय
अहिल्यानगर (प्रतिनिधी)- बीड ते अहिल्यानगर अशी नवी रेल्वे सेवा बुधवार दि. 17 सप्टेंबरपासून सुरू झाली असून, या नवीन रेल्वेचे ऐतिहासिक अहिल्यानगर रेल्वे स्थानकावर जिल्हा प्रवासी संघटनेच्या वतीने स्वागत करण्यात आले.
या प्रसंगी रेल्वेचे मुख्य चालक अतिक शेख व सहाय्यक चालक जितेंद्र बी. यांचा सत्कार करण्यात आला. स्वागत सोहळ्यास जिल्हा प्रवासी संघटनेचे हरजीतसिंह वधवा, स्टेशन मास्तर सुधीर महाजन, तसेच अशोक कानडे, अनिल सबलोक, प्रशांत मुनोत, अशोक शिंगवी, संदेश रपारिया, राजू वर्मा, विपुल शाह आदी मान्यवर उपस्थित होते.
रेल्वेसेवा सुरू झाल्यामुळे बीडवरून अहिल्यानगरला येणाऱ्या तसेच अहिल्यानगरहून बीडला जाणाऱ्या प्रवाशांना मोठी सुविधा उपलब्ध होणार आहे. यामुळे रस्त्यावरील वाहतूक कोंडी कमी होईल आणि अपघाताच्या घटना टाळण्यास मदत मिळणार आहे.
हरजीतसिंह वधवा म्हणाले की, बीडकरांची दीर्घकाळाची मागणी पूर्ण झाली आहे. बीड आणि अहिल्यानगर या दोन्ही जिल्ह्यांतील जनतेसाठी रेल्वेसेवा ही जीवनवाहिनी ठरणार आहे. रस्त्यावरील दिवसेंदिवस वाढणारी वाहतूक कोंडी, वाढते अपघात आणि प्रवासातील त्रास याला आता आळा बसणार आहे. रेल्वेमुळे नागरिकांचा वेळ, पैसा आणि श्रम वाचतील. विद्यार्थी, नोकरदार, व्यापारी तसेच रुग्णसेवेसाठी प्रवास करणाऱ्यांसाठी ही रेल्वे अत्यंत उपयुक्त ठरणार असल्याचे ते म्हणाले.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles