. दहावी-बारावीचा निकाल लवकरच लागणार आहे. निकालाची नवीन तारीख समोर आली आहे. त्यामुळे दहावी-बारावीच्या विद्यार्थ्यांना आणि पालकांची निकालाची प्रतीक्षा आता लवकरच संपणार आहे. १५ मे रोजी दहावी आणि बारावीचे निकाल जाहीर होतील अशी माहिती राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने दिली आहे.
‘राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत फेब्रुवारी-मार्च २०२५ मध्ये घेण्यात आलेल्या इयत्ता दहावी आणि बारावीच्या परीक्षांच्या निकालाचे कामकाज आता अंतिम टप्प्यात आले आहे. त्यामुळे लवकरच निकाल देखील जाहीर होण्याची शक्यता आहे. येत्या १५ मेपर्यंत दोन्ही परीक्षांचे निकाल जाहीर होतील,’ अशी माहिती राज्य मंडळाचे अध्यक्ष शरद गोसावी यांनी दिली.
दहावी, बारावीच्या लेखी परीक्षा दर वर्षीपेक्षा यंदा १० दिवस लवकर सुरू झाल्या होत्या. विद्यार्थ्यांना पुढील करिअरच्या दृष्टीने नियोजनासाठी पुरेसा वेळ मिळावा म्हणून परीक्षेसोबतच निकाल देखील लवकर जाहीर केला जाणार आहे. सध्या सर्व विभागीय मंडळांच्या निकालाचा एकत्रित आढावा घेण्याचे काम सुरू आहे. साधारणपणे ५ ते १० जून या कालावधीत दहावीचा निकाल जाहीर होईल. तर १५ मेपर्यंत बारावीचा निकाल जाहीर होईल.
दहावी आणि बारावीचा निकाल जाहीर होताच तो तुम्ही ऑनलाइन पद्धतीने तात्काळ पाहू शकता. यासाठी विद्यार्थ्यांकडे त्यांच्या हॉल तिकीटाचा नंबर असणे आवश्यक आहे. दहावी आणि बारावीचा निकाल तुम्हाला कोण-कोणत्या वेबसाइटवर पाहयला मिळणार हे घ्या जाणून….
– mahahsscboard.in
– mahresult.nic.in
– hscresult.mkcl.org
– msbshse.co.in
– mh-ssc.ac.in
– sscboardpune.in
– sscresult.mkcl.org
– hsc.mahresults.org.in


