केंद्रीय रेल्वेमंत्री मा.श्री. आश्विनी वैष्णव यांनीयांची सदिच्छा भेट !
📍 संसद भवन, नवी दिल्ली
देशाचे यशस्वी रेल्वेमंत्री मा.श्री. आश्विनी वैष्णव जी यांची नवी दिल्ली येथे सदिच्छा भेट घेतली. या भेटीदरम्यान नाशिक–पुणे हायस्पीड रेल्वे प्रकल्पाबाबत सविस्तर चर्चा केली. या प्रकल्पाच्या प्रस्तावित मार्गात अलीकडे करण्यात आलेल्या बदलाच्या निर्णयाचा फेरविचार करावा, अशी विनंती यावेळी त्यांच्याकडे केली.
काही दिवसांपूर्वी घेतलेल्या निर्णयामुळे संगमनेर व अकोले तालुक्यातील लोकप्रतिनिधी तसेच नागरिकांमध्ये संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले आहे, ही बाब यापूर्वीच मंत्री महोदयांच्या निदर्शनास आणून दिली होती. त्यामुळे स्थानिक जनभावना, विकासाचा समतोल आणि परिसराच्या हिताचा विचार करून रेल्वे मार्ग पहिल्या प्रस्तावित मार्गानुसारच ठेवावा, अशी भूमिका मांडली.
संसद भवनात झालेल्या भेटीत मा. आश्विनी वैष्णव यांनी या विषयावर सकारात्मक प्रतिसाद देत प्रस्तावाचा फेरविचार करण्याचे आश्वासन दिले. यावेळी रेल्वे प्रकल्पामुळे परिसराच्या विकासाला चालना मिळेल, असा विश्वास व्यक्त करण्यात आला.


