Saturday, February 21, 2026

खळबळजनक दावा….लोकसभा निवडणुकीपूर्वी शिवसेना पक्ष एकनाथ शिंदेंच्या हातात नसेल

पुढच्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीपर्यंत एकनाथ शिंदे यांच्याकडे शिवसेना पक्ष राहणार नाही, हे मी खात्रीने सांगतो. येत्या काही दिवसांमध्ये सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानंतर निवडणूक आयोगाकडून धनुष्यबाण हे चिन्ह गोठवले जाईल. याची भीती असल्यामुळेच सर्वोच्च न्यायालयातील सुनावणी वारंवार पुढे ढकलली जात असून शिवसेना पक्ष व चिन्ह सुनावणीबाबत वारंवार तारखा दिल्या आहेत, असा दावा ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केला. ते शुक्रवारी ‘एबीपी’च्या ‘माझा कट्टा’ या कार्यक्रमात बोलत होते. यावेळी संजय राऊत यांनी शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण चिन्हाबाबत खळबळजनक दावे केले.

पुढील लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीपूर्वी एकनाथ शिंदे यांच्याकडे धनुष्यबाण चिन्ह नसेल. धनुष्यबाण चिन्ह गोठवलं जाईल. शिंदे यांच्याकडे त्यांचा पक्ष राहणार नाही, हे मी खात्रीने सांगतो. एकनाथ शिंदे यांनी सरन्यायाधीशांना वाकून पुष्पगुच्छ दिला आहे तरी त्याचा फायदा होणार नाही. भारतीय संविधानातील 10व्या परिशिष्टानुसार धनुष्यबाण हे चिन्ह गोठवले जाील. एकनाथ शिंदे यांना अमित शाह यांनी चालवायला दिलेल्या कंपनीचे शटर डाऊन होईल, असे संजय राऊत यांनी म्हटले.

देश आणि राज्यात भाजप पक्ष मोठ्याप्रमाणावर विस्तारला असून विरोधक निष्प्रभ होत चालले आहेत, याविषयी संजय राऊत यांना मत विचारण्यात आले. त्यावर संजय राऊत यांनी म्हटलेकी, माझ्या हातात राज्याची आणि या देशातील विशिष्ट खात्यांची सत्ता द्या. मी भाजपचे 15 तुकडे करुन दाखवतो. कुठून आणि कसे तुकडे झाले, हे भाजपलाही कळणार नाही. ईडी, सीबीआय आणि पोलिसांच्या जोरावर भाजप कारभार करत आहे. भाजपकडे स्वत:चे कुठे काय आहे? त्यांच्या पक्षात काँग्रेस, राष्ट्रवादी आणि आमची लोकं भरली आहेत. आमच्या हातात सत्ता आल्यावर एकनाथ शिंदे यांच्यासारख्या विकृतीचे अस्तित्वही राहणार नाही, असेही संजय राऊत यांनी म्हटले.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles