Thursday, March 19, 2026

निळवंडे धरणातून नदीपात्रात विसर्ग नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा

सतर्कतेचा इशारा
विषय : निळवंडे धरणातून नदीपात्रात सांडव्याद्वारे विसर्ग सोडणेबाबत.
आज दिनांक 26/07/2025 रोजी निळवंडे धरणातील एकूण पाणीसाठा7341 दलघफु इतका झाला आहे. निळवंडे धरणाच्या जलाशय परिचालन सूची (ROS) नुसार पाणीसाठा नियंत्रित ठेवणे आवश्यक आहे. त्यामुळे आज शनिवार दिनांक 26/07/2025 रोजी सायंकाळी 7.30 वाजता निळवंडे धरणातून नदीपात्रामध्ये विसर्ग वाढून 4835 क्युसेक्स सोडण्यांत येणार आहे. आपत्कालीन परिस्थितीमध्ये निळवंडे धरणातून नदीपात्रामध्ये आवश्यकता भासल्यास टप्प्याटप्प्याने विसर्ग वाढविण्यात येईल.
तरी नदीकाठच्या गावांना या प्रकटनाद्वारे जाहीर आवाहन करण्यात येते की, नदीपात्रातील चल मालमत्ता, चीज वस्तू, वाहने, पशुधन, शेती अवजारे व इतर मनुष्य उपयोगी संसाधने सुरक्षित स्थळी स्थलांतरित करावीत. नदीपात्रात प्रवेश करु नये. कुठलीही जीवित वा वित्त हानी होणार नाही याबाबत दक्षता घेण्यात यावी.
कार्यकारी अभियंता
उर्ध्व प्रवरा धरण विभाग
संगमनेर.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles