Saturday, February 21, 2026

राणे बंधूंच्या शीतयुद्धाचा नवा अंक, नितेश राणेंकडून ‘तो’ स्क्रीनशॉट शेअर;निलेश राणेंवर आरोप

गेल्या काही दिवसांपूर्वी मंत्री नितेश राणे यांनी धाराशिव येथील पक्षाच्या मेळाव्यात बोलताना “कोणी कितीही ताकद दाखवली, कोणी कसेही नाचले, तरी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदीच राहतील आणि राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसच असतील. लक्षात ठेवा, मुख्यमंत्रीपदावर बसलेला नेता भाजपचाच आहे,” असे वक्तव्य केले होते. यानंतर शिवसेनेचे कुडाळचे आमदार आणि नितेश राणे यांचे बंधू निलेश राणे यांनी त्यांना उद्देशून एक सल्ला देणारी पोस्ट केली होती. नितेश राणे यांनी त्या पोस्टला उत्तरही दिलं होतं. यामुळे दोन्ही भावांमध्ये जुंपल्याचे पाहायला मिळाले होते. यानंतर आता पुन्हा एकदा राणे बंधूंमध्ये शीतयुद्ध रंगल्याचं पाहायला मिळत आहे.

मंत्री नितेश राणे यांनी ‘एक्स’वर एक पोस्ट करत आमदार निलेश राणे यांना युती धर्माची आठवण करून दिली आहे. नितेश राणे यांनी एका कार्यकर्त्याचा व्हॉट्सॲप चॅटचा स्क्रीनशॉट शेअर करत महायुतीतील कार्यकर्त्यांना धमकावणे अयोग्य असल्याचं मत व्यक्त केलंय.नितेश राणे यांनी आपल्या पोस्टमध्ये लिहिलंय की, “आदरणीय निलेशजी, आपणच काही दिवसा अगोदर महायुतीबद्दल बोलला होता. आता असे आपल्याच मित्र पक्षाच्या पदाधिकाऱ्याला धमकावणे बरोबर नाही. शेवटी आपण महायुतीचे घटक आहोत. आपण नोंद घ्याल, अशी अपेक्षा करतो, असे त्यांनी म्हटले आहे. आता नितेश राणे यांच्या पोस्टला निलेश राणे काय प्रत्युत्तर देणार? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

https://x.com/NiteshNRane/status/1935404067259334868?ref_src=twsrc%5Etfw%7Ctwcamp%5Etweetembed%7Ctwterm%5E1935404067259334868%7Ctwgr%5E5ed20a08a5aa01c9f64b92f4782faa98f3c44839%7Ctwcon%5Es1_&ref_url=https%3A%2F%2Fmarathi.abplive.com%2Fnews%2Fpolitics%2Fnitesh-rane-shared-screen-shot-of-nilesh-rane-threatening-a-bjp-worker-on-x-maharashtra-politics-marathi-news-1364995

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles