Saturday, February 21, 2026

पंढरपुरच्या वारीच्या मार्गात व्हिआयपी ताफ्यांना नो एन्ट्री; सरकारचा निर्णय

पंढरपुरच्या विठुरायाला भेटण्याचे वेध वारकऱ्यांना लागले आहेत. दरवर्षा लाखो लोक पायी वारी करतात. वारीला ऐतिहासिक वारसा लाभला आहे. त्याचसोबत शेकडो वर्षांची परंपरादेखील आहे. अनेकदा वारीला जाताना वारकऱ्यांना काही कारणामुळे त्रास सहन करावा लागतो. व्हिआयपी वाहनांचे ताफे जात असतात. त्यामुळे वारकऱ्यांना त्रास सहन करावा लागतो. आता त्याच पार्श्वभूमीवर शासनाने मोठा निर्णय घेतला आहे. शासनाने व्हिआयपी वाहनांना नो एन्ट्री केली आहे.

यंदा वारी २६ जून ते १६ जुलै या कालावधीत होणार आहे. आषाढी वारीसाठी वारकऱ्यांच्या सोयीसुविधांसाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या अध्यक्षतेखाली बैठक घेण्यात आली. यामध्ये अनेक महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले.

या बैठकीत घेण्यात आलेला महत्त्वाचा निर्णय म्हणजे वारीच्या मार्गात व्हिआयपी गाड्यांना नो एन्ट्री. अनेकदा व्हिआयपी वाहनांचा ताफा जातो त्यामुळे वारकऱ्यांना त्रास सहन करावा लागतो. यामुळे हा निर्णय घेतला आहे.

यंदा वारीसाठी जाणाऱ्या लोकांना टोलमध्ये सवलत, मानाच्या पालख्या, वारकऱ्यांन फिरती शौचालये, पाणी, मेडिकल सुविधा आणि पोलिस बंदोबस्तासाठी नियोजन करावे, असे निर्देश देण्यात आले आहेत.

वारीच्या मुक्काच्या ठिकाणी पाण्याची सोय, विजेची जोडणी, तंबू उपलब्ध करुन देण्याचाही निर्णय घेण्यात आला आहे. यंदा वाखरी येथे मॉडेल वारीतळ विकसित केले जाणार आहे. रेल्वेच्या ६५ एकर जागेचा यासाठी समावेश केला आहे. यामुळे वारकऱ्यांना दिलासा मिळाला आहे. याचसोबत अनेक ठिकाणी स्वागत मंडप टाकण्यात येणार आहे. लाउड स्पीकरवर बंदी घातली आहे. पालखीसोबत अनेक अॅम्ब्युलन्स, दर्शन पास, पाण्याची सोय, औषधांची व्यवस्था, शौचालये उभारण्याचे निर्देश देण्यात आली आहे. वारकऱ्यांना वारीत काहीही त्रास होऊ नये, याची काळजी घेतली जाणार आहे.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles