नोरा फतेही आणि संजय दत्त यांच्यावर चित्रित झालेल्य गाण्यावरुन मोठा वाद निर्माण झाला आहे. सरके चुनर तेरी सरके हे गाणं युट्युबवर प्रदर्शित कऱण्यात आलं आणि युट्युब, एक्स या सगळ्या ठिकाणी या गाण्यावर बंदी घालण्याची मागणी करण्यात आली. सेवा न्याय उत्थान फाऊंडेशनच्या संस्थापक स्वाती गोयल यांनी एक पोस्ट लिहिली आहे. ज्यात त्यांनी हे गाणं पोस्ट केलं असून यातले शब्द हे खूपच अश्लील आणि उथळ आहेत असं म्हटलं आहे. तसंच अशा गाण्यांना सेन्सॉर मंजुरी कसं काय देतं असाही सवाल त्यांनी केला आहे.
https://x.com/swati_gs/status/2033548826905358361?s=20
सरके चुनर तेरी सरके हे केडी-द डेव्हिल या चित्रपटातील गाणं आहे. दिल्ली पोलिसांच्या सायबर सेलमध्ये या गाण्याच्या विरोधात तक्रार केली गेली आहे. सोशल मीडियावरही या गाण्याबाबत लोक व्यक्त होत आहेत. हे गाणं अश्लीलता पसरवणारं आहे असं अनेक लोकांनी म्हटलं आहे.
या गाण्याविरोधात विनीत जिंदगी यांनी तक्रार दाखल केली आहे. त्यांनी ही देखील मागणी केली आहे की संजय दत्त, नोरा फतेही आणि गीतकार रकीब आलम तसंच चित्रपटाचे दिग्दर्शक प्रेम यांच्या विरोधात कायदेशीर कारवाई केली जावी.


