Monday, March 16, 2026

जामखेडमधील गोळीबारात कुख्यात गुंड पैलवान सागर मोहोळकर याचा उपचारादरम्यान मृत्यू

पुण्यातील कुख्यात गुंड नीलेश घायवळ याच्या गँगने 13 दिवसांपूर्वी केलेल्या गोळीबारात जामखेडमधील कुख्यात गुंड पैलवान सागर मोहोळकर याचा आज उपचारादरम्यान मृत्यू झाला. पुणे इथल्या ससून रूग्णालयात त्याच्यावर उपचार सुरू आहे.

अहिल्यानगर जिल्हा पोलिस दलातील वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या सूत्रांनी मोहोळकर याच्या मृत्यूच्या माहितीला दुजोरा दिला. सागर मोहोळकर याच्यावरील हल्ल्याच्या गुन्ह्यात आता वाढीव जीवे मारण्याचे कलम लागणार आहे. सागर मोहोळकर याच्यावर बुधवारी (ता. 4) जामखेड शहरात हल्ला झाला होता. पुण्यातील नीलेश घायवळ गँगने त्याच्यावर बेछुट गोळीबार केला होता. यात त्याच्या शरीरात सहा गोळ्या लागल्या होत्या. त्यातील दोन गोळ्या काढण्यात आल्या होत्या. परंतु चार गोळ्या त्याच्या शरीरात तशाच होत्या. शस्त्रक्रिया करण्याकरीता शरीराची तशी स्थिती नव्हती. त्यामुळे त्या चार गोळ्या सागर मोहोळकर याच्या शरीरात तशाच होत्या. यातच त्याचा ब्लड प्रेशर कमी-जास्त होत होते. यातूनच त्याला आज त्रास होऊ लागला अन् त्याच्या शरीराच्या हालचाली थांबल्या. यात त्याचा मृत्यू झाला.

सागर मोहोळकर याच्यावर अगदी जवळून गोळाबार करण्यात आल्या होता. त्याच्या तोंडात देखील गोळी मारण्यात आली होती. जखमी अवस्थेत सुरवातीला जामखेड, त्यानंतर अहिल्यानगर शहर आणि पुढे पुणे इथल्या ससून रूग्णालयात दाखल करण्यात आले होते.

गेल्या 13 दिवसांपासून सागर मोहोळकर हा मृत्यूशी झुंज देत होता. त्यात तो आज हरला. सागर मोहोळकर याच्यावर हल्ला करणारे दोन दुचाकीवरून आले होते. पुढे हल्ल्यामागे नीलेश घायवळ गँग असल्याचे पोलिस तपासात आले. त्यानुसार पोलिसांनी चौघांविरोधात गुन्हा नोंदवला.जामखेडमधील एकाला अटक करण्यात आली असून, त्याच्याकडून गावठी पिस्तूल, जिवंत काडसूत आणि दुचाकी असा मुद्देमाल जप्त केला आहे. उर्वरीत तिघे कोथरूडमधील असून, ते पसार आहेत. सागर मोहोळकर याच्यावर घायवळ गँगने पूर्ववैमनस्यातून हल्ला केल्याचे समोर येत आहे.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles