Tuesday, October 28, 2025

पंतप्रधान मोदी हे गेल्या जन्मी छत्रपती शिवाजी महाराज होते… भाजप खासदाराच्या वक्तव्याने गदारोळ

आता भाजपच्या एका खासदाराने एक असं वक्तव्य केलं आहे ज्याने नवा वाद सुरु झाला आहे. ओडिशातील बारगढ येथील भाजप खासदार प्रदीप पुरोहित यांनी संसदेत म्हटलं की, पंतप्रधान मोदी हे गेल्या जन्मी छत्रपती शिवाजी महाराज होते. भाजप खासदाराने लोकसभेत बोलताना एका सांगितलं की, ते एका साधूला भेटले होते. त्या साधूने त्यांना सांगितलं की पंतप्रधान नरेंद्र मोदी हे गेल्या जन्मी छत्रपती शिवाजी महाराज होते. प्रदीप पुरोहित पुढे म्हणाले की, पंतप्रधान मोदी हे खरे तर छत्रपती शिवाजी महाराज आहेत, ज्यांनी महाराष्ट्रासह संपूर्ण देशाला विकास आणि प्रगतीकडे नेण्यासाठी पुनर्जन्म घेतला आहे.प्रदीप पुरोहित यांच्या या विधानाला काँग्रेससह विरोधी पक्षातील अनेक सदस्यांनी विरोध केला आहे. त्यानंतर रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी या वक्तव्यामुळे कोणाच्या भावना दुखावल्या असतील तर सभागृहाच्या कामकाजातून ते काढून टाकण्याचा विचार करावा, अशी विनंतीही केली.

काँग्रेस खासदार वर्षा गायकवाड यांनी X वर पोस्ट केली आहे. “अखंड हिंदुस्तानाचे आराध्य दैवत आणि रयतेचे राजे छत्रपती शिवाजी महाराज यांचा वारंवार अपमान करण्याचे आणि महाराष्ट्रातील तसेच जगभरातील शिवप्रेमींची अस्मिता दुखावण्याचे नियोजनबद्ध कारस्थान भाजपच्या नेतेमंडळींकडून केले जात आहे. या लोकांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा मानाचा जिरेटोप नरेंद्र मोदी यांच्या डोक्यावर बसवून शिवरायांचा घोर अपमान केला आणि आता या भाजप खासदाराचे हे घृणास्पद वक्तव्य ऐका… शिवरायांचा वारंवार अपमान करणाऱ्या भाजपचा आम्ही जाहीर निषेध करतो. भाजप शिवद्रोही आहे. शिवरायांचा अपमान आम्ही कदापि सहन करणार नाही. नरेंद्र मोदींनी त्वरित देशाची माफी मागावी आणि या खासदाराला निलंबित करावे.”

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles