Friday, February 20, 2026

डॉ.हृषीकेश पंडित यांच्या लॅप्रोस्कोपिक सर्कलाज शस्त्रक्रियेची कॅनडा येथील कॉन्फरन्ससाठी निवड

नगर : भिंगार येथील पंडित हॉस्पिटलचे संचालक स्त्रीरोग तज्ज्ञ, लॅप्रोस्कोपिक सर्जन डॉ.हृषीकेश पंडित यांच्या आधुनिक लॅप्रोस्कोपिक सर्कलाज शस्त्रक्रियेची कॅनडा येथील आंतरराष्ट्रीय कॉन्फरन्ससाठी निवड झाली आहे. पुणे येथे झालेल्या इंडियन असोसिएशन ऑफ गायनेकोलॉजिक एंडोस्कोपिस्टस आणि अमेरिकन असोसिएशन ऑफ गायनेकोलॉजिक लॅप्रोस्कोपिस्टस यांच्या वार्षिक कॉन्फरन्समध्ये डॉ.पंडित यांचा सन्मान करण्यात आला. डॉ.पंडित यांच्या ॲडव्हान्स्ड लॅप्रोस्कोपिक सर्कलाज या शस्त्रक्रियेसंबंधी व्हिडिओ सादरीकरणास प्रथम क्रमांकाचे पारितोषिक मिळाले.

डॉ.हृषीकेश पंडित यांचा थ्री डी  लॅप्रोस्कोपिक शस्त्रक्रियेमध्ये हातखंडा आहे. त्यांच्या शस्त्रक्रियांचे व्हिडिओ अनेक प्रगत देशातही अभ्यासले जातात. अत्याधुनिक लॅप्रोस्कोपिक सर्कलाज शस्त्रक्रिया करण्याच्या त्यांच्या कौशल्याची आंतरराष्ट्रीय स्तरावर नावाजली गेली आहे. या शस्त्रक्रियेमुळे गर्भाशय मुखाच्या उच्च स्थानी टाके लावल्याने अधिक सुरक्षितता मिळते. टाके सरकण्याची धोका कमी होतो, टाके काढण्यासाठी भूल देण्याची आवश्यकता पडत नाही, नैसर्गिक प्रसूतीची शक्यता वाढते, उशिरा गर्भातील त्रुटी आढळल्यास मोठ्या शस्त्रक्रियेची गरज लागत नाही. महिला व मातांच्या आरोग्यासाठी अत्याधुनिक आणि दुर्बिणीच्या सहाय्याने करावयाच्या शस्त्रक्रिया विकसित करण्याच्या दिशेने डॉ.पंडित यांनी महत्वपूर्ण योगदान दिले आहे. याशिवाय त्यांनी एंडोमेट्रियोसिसच्या निदानासाठी नवीन तंत्रज्ञान सादर केले असून या संशोधनामुळे अधिक चांगले परिणामकारक उपचार करणे शक्य होणार आहे.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles