Thursday, February 19, 2026

परळीतील ‘महापशुधन‌ एक्स्पो’वर कोट्यवधींचा खर्च, VIDEO पंकजा मुंडे यांच्यावरील गाण्यासाठीही कोटी रुपये

राज्याच्या पशुसंवर्धन मंत्री पंकजा मुंडे यांनी बीड जिल्ह्यातील परळी येथे महापशुधन एक्सो कार्यक्रमाच्या माध्यमातून राज्याचं लक्ष वेधलं होतं. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह अनेक दिग्गजांनी येथील प्रदर्शनाला भेट दिली, येथील भव्यता चर्चेचा विषय बनली होती. आता, या महापशुधन एक्स्पोच्या आयोजनावरुन करुणा मुंडे शर्मांनी मंत्री पंकजा मुंडे यांना लक्ष्य केले आहे. महापशुधन म्हणजे प्रपोगंडा करण्याचा प्रकार होता, त्याच्या मंडपासाठी तीन कोटी रुपये खर्च करण्यात आल्याचे करुणा शर्मा यांनी म्हटले.

पंकजा मुंडे यांच्यावर गाणे म्हणण्यासाठी आनंद शिंदे यांना बोलवण्यात आलं होतं. पंकजा मुंडे यांचे गाणे म्हणण्यासाठी कोट्यवधी रुपये खर्च करण्यात आले. पशूंसाठी आम्ही 50 कोटी देणार आहोत हे सांगण्यासाठी 5 कोटी रुपये जाहिरातीसाठी आणि सांगण्यासाठी खर्च करण्यात आल्याच आरोप करुणा शर्मा यांनी केला आहे

. बीडमध्ये जागोजागी जनावरांना कचरा खाऊन जगावे लागत आहे, त्यांना चारा नाही पाणी नाही ते नालीतलं पाणी पिऊन जगत आहेत. सत्ता आणि पॉवर असलेले लोक जनतेचा पैसा खर्च करत आहेत. त्याच्यामुळे पंकजा मुंडेंवर मी एक गाणं तयार केले आहे, असे म्हणत करुणा शर्मांनी पंकजा मुंडेंवर घणाघाती टीका केली.

मागील वर्षी अल्पशा अतिवृष्टीमध्ये शेतकऱ्यांची झालेली नुकसान भरपाई म्हणून सरकारने शेतकऱ्यांना हेक्टरी 25,000 मदत देण्याची घोषणा केली होती. मात्र, तुम्ही हेक्टरी 2000 रुपयेच दिले, असे म्हणत करुणा शर्मा यांनी पंकजा मुंडेंवर गाणंही सादर केलं. पंकजाताई बाग नासवते रे बीजेपीच्या कमळाचा.. असे मिश्किल गाणे म्हणत त्यांनी पंकजा मुंडेवर टीका केली. मी बीडवासियांना शब्द देते की जसं माझ्या सासर्‍यांनी (स्वर्गीय गोपीनाथ मुंडेंनी) जात पात न बघता गोरगरीब शेतकरी लोकांचे काम करून पुढाकार घेतला होता. परळीपासून सुरुवात करून बीड जिल्हा पूर्ण बीजेपीचा केला होता. तसेच, काम मी करणार असून लोकांच्या हितासाठी लढणार असल्याचेही करुणा शर्मा यांनी म्हटले.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles