Saturday, February 21, 2026

हिवाळी अधिवेशनावर धडकणार जुनी पेन्शन जनक्रांती मोर्चा

हिवाळी अधिवेशनावर धडकणार पेन्शन जनक्रांती मोर्चा
महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन संघटनेचे सहकार्य अध्यक्ष श्री राजेंद्र ठोकळ व पेन्शन संघटनेचे जिल्हाध्यक्ष श्री प्रवीण झावरे यांची माहिती

राज्यामधील 1 नोव्हेंबर 2005 नंतर सेवेत आलेल्या सर्व शासकीय निमशासकीय कर्मचारी अधिकारी शिक्षक शिक्षकेतर सर्व कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू करावी या मागणीसाठी शुक्रवार दी.12 डिसेंबर रोजी महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन संघटने कडून पेन्शन
जनक्रांती मोर्चा चे नियोजन पेन्शन संघटनेचे राज्याध्यक्ष श्री वीतेश खांडेकर यांच्या नेतृत्वात करण्यात आलेले आहे. अहिल्यानगर जिल्ह्यातूनही मोठ्या संख्येमध्ये कर्मचारी या प्रिंशन जनक्रांती मोर्चामध्ये सहभागी होण्यासाठी जाणार आहेत. अशी माहिती पेन्शन संघटनेचे राज्य सहकार्याध्यक्ष राजेंद्र ठोकळ जिल्हाध्यक्ष प्रवीण झावरे कार्याध्यक्ष श्री राज कदम जिल्हा सचिव शिवनाथ भुजबळ कोषाध्यक्ष श्री अरविंद थोरात ,सल्लागार श्री.शरद कोतकर, माजी अध्यक्ष श्री.नाना गाढवे शिक्षक नेते सचिन नाबगे यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिलेली आहे.
या मोर्चासाठी प्रत्येक तालुक्यातून पेन्शन शिलेदार मोठ्या संख्येने उपस्थित राहणार आहेत. विविध विभागामध्ये जाऊन जनजागृती करण्याचे नियोजन झालेले आहे. मोर्चाच्या तयारीसाठी व यशस्वीतेसाठी पेन्शन संघटनेचे विकास खेबडे ,मनोहर आढळ ,सतीश कासार ,राहुल लोखंडे, अशोक जाधव ,शरद गावडे ,राहुल ढाकणे ,राजू खरमाळे, किरण निंबाळकर ,मच्छिंद्र कदम, किशोर नवसरे ,कानिफनाथ बोराडे, सतीश अंधारे सर्व तालुका अध्यक्ष व कार्यकारणी पेन्शन शिलेदार परिश्रम घेत आहेत.

महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन संघटनेच्या माध्यमातून पेन्शन या विषयावर गेल्या बारा वर्षापासून विविध प्रकारचे मोर्चे व आंदोलने करण्यात आलेली आहेत. त्या संघर्षातून कर्मचाऱ्यांना फॅमिली पेन्शन ग्रॅज्युटी रुग्णता पेन्शन त्याचप्रमाणे 2005 पूर्वीच्या जाहिराती असणाऱ्या कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन इत्यादी बाबी पेन्शन संघटनेच्या संघर्षामुळेच कर्मचाऱ्यांच्या पदरी पडलेल्या आहेत. परंतु अंतिम ध्येय ही जुनी पेन्शनच आहे. जोपर्यंत जुनी पेन्शन मिळत नाही. तोपर्यंत हा लढा कायमस्वरूपी चालूच राहील.
श्री राजेंद्र ठोकळ
राज्य सहकार्यअध्यक्ष पेन्शन संघटना महाराष्ट्र राज्य

अधिवेशनाच्या तारखेमध्ये बदल झाल्यामुळे 15 तारखे ऐवजी 12 डिसेंबरला पेन्शन संघटनेने हिवाळी अधिवेशनावर मोर्चा आयोजित केला आहे. अहिल्या नगर जिल्ह्यातून सुद्धा सर्व विभागातून कर्मचारी मोठ्या प्रमाणामध्ये पेन्शन क्रांती मोर्चा साठी सहभागी होणार आहेत. प्रत्येक पेन्शन शिलेदाराने आपल्या हक्कासाठी संघर्षात सहभागी व्हावे. व मोठ्या संख्येने नागपूर या ठिकाणी उपस्थित राहण्याचे अवाहन करण्यात येत आहे.
श्री प्रवीण झावरे
जिल्हाध्यक्ष
जुनी पेन्शन संघटना अहिल्यानगर.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles